राज्यातील सैन्य भरती तात्काळ घ्या, सदाभाऊ खोत शिष्टमंडळासह अजित पवारांच्या भेटीला

| Updated on: Sep 22, 2021 | 11:35 PM

सैन्य भरती  तात्काळ व्हावी यासाठी रयत क्रांती संघटनेचे नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली सैन्य भरतीचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी सदाभाऊ खोत आणि शिष्टमंडळाचे 3 महत्वाच्या मागण्या केल्या आहेत.

राज्यातील सैन्य भरती तात्काळ घ्या, सदाभाऊ खोत शिष्टमंडळासह अजित पवारांच्या भेटीला
सदाभाऊ खोत आणि शिष्टमंडळ अजित पवारांच्या भेटीला
Follow us on

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे दोन वर्षापासून सैन्य भरती प्रक्रिया राबविण्यात आली नाही. त्यामुळे मुलांची वयोमर्यादा संपत चालली आहे. सैन्य भरती  तात्काळ व्हावी यासाठी रयत क्रांती संघटनेचे नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली सैन्य भरतीचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी सदाभाऊ खोत आणि शिष्टमंडळाचे 3 महत्वाच्या मागण्या केल्या आहेत. (Sadabhau Khot and delegation meet Deputy CM Ajit Pawar)

सदाभाऊ खोत आणि शिष्टमंडळाच्या मागण्या

1. लगतच्या कर्नाटक, गुजरात राज्यांमध्ये गेल्या वर्षी पासून भरती प्रक्रिया सुरु आहे. तरी महाराष्ट्रामध्ये भरती प्रक्रिया त्वरित सुरु करावी. ती भरती प्रक्रिया पुढे ढकलू नये.

2. जर आपणास वाटत असेल की, जिल्ह्यात जास्त गर्दी होत आहे तर प्रत्येक जिल्ह्यात भरती प्रक्रिया करावी. त्यामुळे गर्दी होणार नाही आणि मुलांना देश सेवा करण्याची संधी मिळेल.

३. संरक्षण मंत्रालयाकडून यापूर्वी 5 मार्च 2021 ते 24 मार्च 2021 रोजी सैन्यभरतीचा कार्यक्रम पाठवण्यात आला होता. परंतु महाराष्ट्रात याची अंमलबजावणी झाली नाही. तसेच पुणे ए आर ओ चा सैन्यभरतीचा कार्यक्रम 7 सप्टेंबर 2021 ते 24 सप्टेंबर 2021 रोजी जाहीर करण्यात आला होता, पण तो ही राबविण्यात आला नाही. कोल्हापूर ए आर ओ चा सैन्य भरती कार्यक्रम 1 डिसेंबर 2021 ते 22 डिसेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आला आहे, तरी सदर भरतीसाठी कोरोनाची सर्व खबरदारी घेऊन (RTPCR टेस्ट करून) सैन्य भरती सुरु करावी. महाराष्ट्रातील लाखो तरुण भरतीसाठी पर्व तयारी करत आहेत. आपण जर याबाबत वेळीच नियोजन न केलेस वयोमर्यादा संपल्यामुळे अनेक तरुणांचे भवितव्य अंधकारमय बनेल. तरी देशसेवा करण्याची इच्छा असणान्या तरुणांच्या बाबतीत शासनाने तातडीने लक्ष घालावे.

अजित पवारांचे सैन्य भरतीचे आदेश

भरती प्रक्रियेबाबत रयत क्रांती संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापुर येथे17 सप्टेंबर रोजी धडक मोर्चा काढला होता. यामध्ये अनेक तरुण आंदोलनात उतरले होते. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट झाल्यानंतर त्यांनी तात्काळ सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी व सर्व पोलिस अधीक्षक यांना तात्काळ सैन्य भरती घेणेबाबतचे निर्देश दिले. यावेळी रयतचे युवा नेते सागर खोत, युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे, राहुल पाटील, आनंदराव पवार, सत्यजित कदम, आकाश राणे, विजय पाटील, अजय सुरवसे, आदी उपस्थित होते. सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे आमदार सदाभाऊ खोत यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले.

साडे पंधरा हजाराहून अधिक पदांची ‘एमपीएससी’ मार्फत भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत राज्य शासनातील साडे पंधरा हजार पदांची भरती करण्याचा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात दिला होता. त्यासाठी ‘एमपीएससी’ आणि सामान्य प्रशासन विभागाच्या सातत्याने बैठका घेत, या भरती प्रक्रियेतील त्रुटी आणि अडचणी दूर करत त्याचा पाठपुरावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या स्टाईलने केला. त्यामुळे या भरती प्रक्रियेला गती मिळाली.

राज्य शासनाच्या विविध विभागांची क्षेत्रीय स्तरावरील महत्वाची रिक्त कार्यकारी पदे तातडीने भरण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवश्यक रिक्त पदांची माहिती तात्काळ संकलित करण्याचे निर्देश दिले होते. गट ‘अ’, गट ‘ब’ व गट ‘क’ श्रेणीतील कार्यकारी पदे भरतीप्रक्रियेद्वारे तातडीने उपलब्ध करुन देण्यात आली. ‘एमपीएससी’मार्फत भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गातील वर्ष 2018 पासूनच्या एकूण 15 हजार 511 पदांच्या भरतीस मान्यता मिळाली. सर्वच विभागांना त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

इतर बातम्या :

नारायण राणेंनी घेतली अमित शाहांची भेट, जनआशीर्वाद यात्रेतील वादावर चर्चा?

मुख्यमंत्र्यांचा अजित पवार, काँग्रेसला धक्का? प्रभाग रचनेवर कॅबिनेटमध्ये मतभेद? नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

Sadabhau Khot and delegation meet Deputy CM Ajit Pawar