‘मातोश्री’चं नाव दिल्ली ठेवण्याचा विचार दिसतो! सदाभाऊ खोतांचा आदित्य ठाकरेंना जोरदार टोला

महाराष्ट्रातून अनेक गोष्टी हलविण्याचे डाव सुरू आहेत. पण 2024ला शिवसेना तिथे बसेल आणि सगळं थांबवेल. शिवसेना प्रत्येक राज्याला न्याय देईल, असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलंय. आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याचा हाच धागा पकडत माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आदित्य यांना जोरदार टोला हाणलाय.

मातोश्रीचं नाव दिल्ली ठेवण्याचा विचार दिसतो! सदाभाऊ खोतांचा आदित्य ठाकरेंना जोरदार टोला
सदाभाऊ खोत, आदित्य ठाकरे
Image Credit source: TV9
| Updated on: Feb 27, 2022 | 7:06 PM

मुंबई : युवासेना प्रमुख आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिल्लीच्या तख्तावर शिवसेना बसणार असा पुनरुच्चार केलाय. गजानन किर्तीकर (gajanan kirtikar) म्हणाले मुंबईचं (Mumbai) महत्त्व कमी केलं जात आहे. सगळं दिल्लीला नेण्याचा डाव आहे. पण 2024मध्ये आपण सर्व दिल्लीत बसणार म्हणजे बसणारच, असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं. मी दिल्लीत जे बोललो ते उत्तर प्रदेशातही बोललो. इथेही तेच सांगत आहे. महाराष्ट्रातून अनेक गोष्टी हलविण्याचे डाव सुरू आहेत. पण 2024ला शिवसेना तिथे बसेल आणि सगळं थांबवेल. शिवसेना प्रत्येक राज्याला न्याय देईल, असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलंय. आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याचा हाच धागा पकडत माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आदित्य यांना जोरदार टोला हाणलाय.

माजी राज्यमंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. आदित्य ठाकरे यांनी 2024 ला शिवसेना दिल्लीच्या तख्तावर बसेल असा दावा केलाय. त्यावर सदाभाऊ खोत यांनी ‘2024 मध्ये आपण सर्व दिल्लीमध्ये बसणार म्हणजे बसणारच – आदित्य ठाकरे… घरातून केलेला कारभार बघता ‘मातोश्री’चं नाव दिल्ली ठेवण्याचा विचार दिसतो’, असं ट्वीट करत जोरदार टोला लगावलाय.

नितेश राणेंचाही आदित्य ठाकरेंना टोला

नितेश राणे यांनी नेहमीच्या शैलीत खोचक ट्वीट करत आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. ‘काही करता साधं नारळ फुटता फुटेना, पण लाल किल्ल्यावर शपथ घ्यायचे स्वप्न काही सूटेना!’ अशा शब्दात नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केलीय. तसंच आदित्य ठाकरे यांचा नारळ फोडतानाचा एक व्हिडिओही नितेश राणे यांनी शेअर केलाय. यात आदित्य ठाकरे नारळ फोडताना दिसून येत आहेत. मात्र, तो नारळ फोडण्यासाठी त्यांना बरीच मेहनत घ्यावी लागल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळतं.

इतर बातम्या : 

Video : आधी अलिशान “महिंद्रा थार”, मग बैलगाड्याचा कासरा, भरणे मामांच्या डबल ड्राईव्हिंगची हवा

फोन टॅपिंग प्रकरणात फडणवीसांच्या भूमिकेची चौकशी करा, फोन टॅपिंगमागे नेमकं कोण?