गरबा मंडपात मुस्लिमांना प्रवेश नको, सामानही खरेदी करू नका; साध्वी प्रज्ञासिंह यांचं धक्कादायक विधान

| Updated on: Sep 29, 2022 | 11:43 AM

गरबा मंडपात आयडी चेक करूनच सर्वांना प्रवेश दिला पाहिजे. मंडपात मुस्लिम समुदायाला प्रवेश दिला जाऊ देऊ नये. आम्हाला आमची पूजा पद्धती शुद्ध ठेवायची आहे.

गरबा मंडपात मुस्लिमांना प्रवेश नको, सामानही खरेदी करू नका; साध्वी प्रज्ञासिंह यांचं धक्कादायक विधान
साध्वी प्रज्ञासिंह यांचं धक्कादायक विधान
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

भोपाळ: देशभरात नवरात्रोत्सवाची (Navratri 2022) धूम सुरू आहे. संपूर्ण देशात मंडपांमध्ये देवीची पूजा केली जात असून गरब्याचं आयोजनही केलं जात आहे. मात्र, यंदा गरब्याच्या मंडपावरून मध्य प्रदेश सरकारने (Madhya Pradesh) काही कठोर निर्देश जारी केले आहेत. गरबा मंडपातील एंट्रीपासून ते सुरक्षेपर्यंतच्या विविध मुद्द्यावर जिल्हा प्रशासनाला गाईडलाईन जारी करण्यात आल्या आहेत. या शिवाय मध्य प्रदेशातील भाजपचे नेते सुद्धा मंडपातील प्रवेशावरून सातत्याने प्रतिक्रिया देत आहे. भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर (MP Sadhvi Pragya Singh Thakur) यांनीही या मुद्द्यावरून धक्कादायक विधान केलं आहे.

गरबा मंडपात आयडी चेक करूनच सर्वांना प्रवेश दिला पाहिजे. मंडपात मुस्लिम समुदायाला प्रवेश दिला जाऊ देऊ नये. आम्हाला आमची पूजा पद्धती शुद्ध ठेवायची आहे. आमच्या धार्मिक कार्यक्रमात मुस्लिम समुदायांनी तयार केलेली कोणतीही वस्तू असता कामा नये. मंडपाच्या आसपास मुस्लिमांची दुकाने असता कामा नये. त्यांची दुकाने असल्यास त्या दुकानातून सामान खरेदी करू नका, असं धक्कादायक विधान साध्वी प्रज्ञा सिहं यांनी केलं आहे.

या पूर्वी मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी गरबा मंडपावरून प्रतिक्रिया व्यक्त केली होती. माँ दुर्गेच्या आराधनेचं पर्व म्हणजे नवरात्री उत्सव हा आमच्या आस्थेचा विषय आहे. अशा पवित्र दिवशी शांती आणि सौहार्दाचं वातावरण राहिलं पाहिजे. त्यामुळेच मंडपात ओळखपत्रं पाहूनच प्रवेश देण्याच्या आयोजकांना सूचना करण्यात आल्याचं मिश्रा म्हणाले होते.

हे सुद्धा वाचा

मिश्राच नाही तर पर्यटन मंत्री ऊषा ठाकूर यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिलेली आहे. ऊषा ठाकूर यांनी सर्वात आधी यावर प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी हिंदू संघटनांचं समर्थनही केलं होतं. गरबा मंडपात आधार कार्ड पाहूनच प्रवेश दिला पाहिजे, असं त्या म्हणाल्या होत्या.