AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivaji Maharaj Statue Collapsed : ‘मी मोदींना पत्र लिहून सांगितलेलं की, हा पुतळा…’, काय म्हणाले संभाजी राजे

Shivaji Maharaj Statue Collapsed : "पुतळा गावात उभा करायचा असेल, तर अनेक जाचक अटी असतात. अनेकांना परवानगी सुद्धा मिळत नाही. खुद्द पंतप्रधान, राष्ट्रपती पुतळ्याच्या उद्घाटनासाठी येणार असतील, तर अनेक जाचक अटी असतात. या जाचक अटींच पालन झालं होतं का?" असे प्रश्न संभाजी राजे यांनी विचारले आहेत.

Shivaji Maharaj Statue Collapsed :  'मी मोदींना पत्र लिहून सांगितलेलं की, हा पुतळा...', काय म्हणाले संभाजी राजे
Sambhaji Raje
| Updated on: Aug 28, 2024 | 11:48 AM
Share

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी कोसळला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची भावना आहे. मालवण सिंधुदुर्गात राजकोट किल्ला आहे. अवघ्या आठ महिन्यात शिवरायांचा पुतळा कोसळला. या घटनेवरुन विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरलं आहे. संभाजी राजे यांनी या विषयाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. “मालवण राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शास्त्रोक्त पद्धतीने बसवण्यात आला नव्हता, याची कल्पना मी त्यावेळीच दिली होती” असं संभाजी राजे म्हणाले.

“12 डिसेंबर 2023 रोजी मी नरेंद्र मोदींना पत्र दिलं. पुतळ्याच काम पूर्णत्वाला नेललं नाही. त्यामुळे हा पुतळा बदलावा असं मी 12 डिसेंबर 2023 रोजी पत्रात नमूद केलं होतं” असं संभाजी राजे म्हणाले. “चार-पाच दिवस आधी हा पुतळा कोसळला महाराष्ट्राच्या दृष्टीने ही दुर्देवी बाब आहे. जनता आपल्या भावना व्यक्त करणार, जे घडायला नको होतं, ते घडलं” असं संभाजी राजे म्हणाले. “पुतळा गावात उभा करायचा असेल, तर अनेक जाचक अटी असतात. अनेकांना परवानगी सुद्धा मिळत नाही. खुद्द पंतप्रधान, राष्ट्रपती पुतळ्याच्या उद्घाटनासाठी येणार असतील, तर अनेक जाचक अटी असतात. या जाचक अटींच पालन झालं होतं का? कलासंच न्यायालयाने परवानगी दिली होती का? हे प्रश्न पुढे आले आहेत” असं संभाजी राजे म्हणाले.

‘मला आश्चर्य वाटतं मी, जेव्हा….’

“या घटनेत राजकारण बाजूला ठेण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या बाबतीत दुमत असू शकत नाही. पण काय चुकतय यावर चर्चा झाली पाहिजे” असं संभाजी राजे म्हणाले. “मला आश्चर्य वाटतं, मी गड-किल्ले अतिक्रमण मुक्त झाले पाहिजेत हा विषय हाती घेतला, तेव्हा या राजकीय नेत्यांनी भूमिका घेतली नाही” असं संभाजी राजे म्हणाले.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती