AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनिल देशमुखांचं डोकं फिरलंय… समित कदम प्रचंड संतापले; पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त करत केला मोठा दावा

"देवेंद्र फडणवीसांना डॅमेज करणं हा उद्देश आहे", असे वक्तव्य समित कदम यांनी केले. नुकतंच त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

अनिल देशमुखांचं डोकं फिरलंय... समित कदम प्रचंड संतापले; पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त करत केला मोठा दावा
| Updated on: Jul 29, 2024 | 12:13 PM
Share

Samit Kadam on Anil Deshmukh : गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील राजकारणात समित कदम हे नाव सातत्याने चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. ईडीच्या कारवाईपासून वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी यांचा प्रस्ताव घेऊन समित कदम हे माझ्याकडे आले होते, असा दावा अनिल देशमुखांनी केला आहे. यानंतर अनिल देशमुखांनी समित कदम आणि देवेंद्र फडणवीसांचे घरगुती संबंध असल्याचा दावाही केला. आता यावर समित कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अनिल देशमुखांनी माझे देवेंद्र फडणवीसांसोबत दाखवलेले फोटो जगजाहीर आहेत. ते सतत तेच फोटो दाखवत आहेत. यातून “देवेंद्र फडणवीसांना डॅमेज करणं हा उद्देश आहे”, असे वक्तव्य समित कदम यांनी केले. नुकतंच त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

“माझे आणि फडणवीसांचे फोटो जगजाहीर”

मी कालच याबद्दल माझं मत माध्यमांसमोर मांडलं आहे. अनिल देशमुखांनी माझे-देवेंद्र फडणवीसांसोबत असलेले फोटो दाखवले. यात नवीन काहीच नाही. माझे फेसबुक, इन्स्टाग्रामवर यावर जे काही फोटो आहेत, तेच फोटो त्यांनी दाखवले. त्यांनी त्यात काही हेरगिरी केलेली नाही. माझे आणि फडणवीसांचे फोटो जगजाहीर आहेत. अनेक वर्तमानपत्रात आलेले आहेत.

२०१६ पासून माझा जनसुराज्यशक्ती हा आमचा स्वतंत्र पक्ष आहे. मी त्याचा राज्याचा अध्यक्ष आहे. आम्ही NDA चे घटक पक्ष झाल्यानंतर पक्षाच्या कामानिमित्त आम्हाला वेगवेगळ्या बैठकीत निमंत्रण दिलं जातं. पंतप्रधान मोदींपासून ते राज्यातील विविध बैठकींसाठी आम्हाला बोलवलं जातं. त्यात फडणवीसांची भेट होते. त्यासोबत इतर पक्षातील नेत्यांचीही भेट होते. त्यामुळे यात काही मोठं सांगितल्यासारखं मला वाटत नाही. त्यांनी दाखवलेले फोटो हे जगजाहीर आहेत, असेही समित कदम म्हणाले.

“देवेंद्र फडणवीसांना डॅमेज हाच यामागचा उद्देश”

सांगलीतील एका घटक पक्षाचा मी राज्य अध्यक्ष आहे. मला अनेक पक्षाचे नेते ओळखतात. अनिल देशमुख हे ही बाब कदाचित विसरले असावेत की ते अन्न नागरी पुरवठा मंत्री असल्यापासून माझी आणि त्यांची ओळख आहे. माझी आणि देवेंद्र फडणवीसांची ओळख त्यानंतर झाली. गेल्या तीन वर्षांपासून अनिल देशमुख हे गप्प राहिले. आता ते हा विषय मांडत आहे. त्यामुळे त्यांचा उद्देश देवेंद्र फडणवीसांना डॅमेज करणं हा असल्याचे समित कदम यांनी सांगितले.

Follow Us
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....