MVA : ‘औरंगाबादच्या नामांतराचा आव आणायचा, हिरवं प्रेम हेच खरं हिंदुत्व म्हणायचं’ संदीप देशपांडेंनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची स्क्रिप्ट सांगितली…

MNS : संदीप देशपांडेंनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची स्क्रिप्ट सांगितली, वाचा सविस्तर...

MVA : औरंगाबादच्या नामांतराचा आव आणायचा, हिरवं प्रेम हेच खरं हिंदुत्व म्हणायचं संदीप देशपांडेंनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची स्क्रिप्ट सांगितली...
| Updated on: Jun 29, 2022 | 4:11 PM

मुंबई : सध्या राज्यातील राजकारणात सत्तांतराच्या शक्यतेचं वादळ आलंय. सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षही या वादळाचा भाग आहेत. अश्यात सरकार अल्पमतात आल्याने मुख्यमंत्री आपल्या पदाचा राजीनामा देतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अश्यात मनसेकडून तर मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची पूर्ण स्क्रिप्टचं सांगण्यात आली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी एक ट्विट करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या राजीनाम्यावर भाष्य केलंय. “राजीनाम्याची ‘ स्क्रीप्ट ‘ठरली. संभाजीनगरच्या नामांतराचा ‘आव आणायचा आणि आपले ‘हिरवे प्रेम हेच खरे हिंदुत्व हे सिद्ध करायचे… कुठे आणून ठेवलीये मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांची शिवसेना?”, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

औरंगाबाद नामातंर

औरंगाबादचं नामांतर करून ते संभाजीनगर करण्याचा मानस शिवसेना मनात बाळगून आहे. त्यावरच संदीप देशपांडे यांनी बोट ठेवलंय. संभाजीनगरच्या नामांतराचा आव आणायचा आणि आपलं हिरवं प्रेम हेच खरं हिंदुत्व हे सिद्ध करायचं, असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत. दरम्यान, औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याची मागणी काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली आहे. कॅबिनेटच्या बैठकीत त्याबाबतचा प्रस्ताव आणून ठराव मंजूर केला जाणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलीये.

2019 च्या निवडणुकीवेळी ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?’ असे पोस्टर शिवसेनेने जागोजागी लावले होते. त्याचा धागा धरत संदीप देशपांडे यांनी शिवसेनेनेला प्रश्न विचारला आहे. ‘कुठे आणून ठेवलीये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांची शिवसेना?’, असा सवाल त्यांनी केला आहे. शिवसेनेची हिंदुत्वाची धार बोथट झाली असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं आहे.

फडणवीसांचा राज ठाकरे यांना फोन

उद्या ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करायचं आहे. त्यासाठी दोन्ही बाजूने कसून प्रयत्न सुरू आहेत. आमदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अश्यात देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना बहुमतासाठी मदत करा, असा फोन केला असल्याची माहिती आहे. शिंदे गट भाजपासोबत सत्तास्थापन करणार असल्याचे जवळपास स्पष्टच आहे. यामुळे भाजपाची संपूर्ण यंत्रणाच आता कामाला लागलीयं. इतकंच नाही तर राज्यातील भाजपाच्या सर्व आमदारांना आजच मुंबईत दाखल होण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आलेत.