Sandipan Bhumare: ‘उगा शहापणा नको करु, कशाला फोन केला तू?’ संदीपान भुमरेंची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल!

| Updated on: Jul 24, 2022 | 7:15 AM

Sandipan Bhumare Audio Clip : तुम्ही असं करायला नाही पाहिजे होते, असं म्हणताच संदीपान भुमरे संतापल्याचं कथित ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू आलंय

Sandipan Bhumare: उगा शहापणा नको करु, कशाला फोन केला तू? संदीपान भुमरेंची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल!
ऐका नेमकं काय म्हणाले भुमरे?
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

औरंगाबाद : बंडखोर आमदार संदीपान भुमरे यांची नावाने एका कथित ऑडिओ क्लिप (Sandipan Bhumare Audio Clip viral) सध्या तुफान व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये योगेश क्षीरसागर (Yogesh Kshrisagar) नावाच्या एका शिवसैनिकानं फोन केला होता. या फोन कॉल रेकॉर्डिंगची क्लिप सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली आहे. संदीपान भुमरे हे पैठण मतदारसंघाचं नेतृत्त्व करतात. त्यांनीही एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरी केली होती. दरम्यान, आता आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray News) पैठण दौऱ्यादरम्यान झालेल्या गर्दीवरुन शिवसैनिकांनी संदीपान भुमरे यांना आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला. या शिवसैनिकाला संदीपान भुमरे यांनी ज्या प्रकारे प्रत्युत्तर दिलंय, तो चर्चेचा विषय ठरलाय. दरम्यान, या ऑडिओ क्लिपची पुष्टी करण्यात आलेली नाही. या ऑडिओ क्लिपमध्ये शिवसैनिक संदीपान भुमरे यांनी केलेल्या बंडखोरीवर नाराजी व्यक्त करताना दिसला. त्याच्यावर सुरुवातीला चढ्या आवाजात उगा शहाणपणा नको करु, असं म्हणत भुमरे यांनी सुनावलं. पण नंतर याच शिवसैनिकाची समजूत काढण्याचाही त्यांनी नंतर प्रयत्न केला. पाहा व्हिडीओ, नेमकं काय घडलं…?

पाहा व्हिडीओ : नेमकं ऑडिओ क्लिपमध्ये काय?

कथित ऑडिओ क्लिपमध्ये शिवसैनिक संदीप भुमरे यांना सुरुवातील जय महाराष्ट्र म्हणतो. त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या संभाजीनगर मधील दौऱ्याबाबत विचारणा करतो. नंतर आदित्य ठाकरेंच्या रॅलीला झालेल्या गर्दीवर संदीपान भुमरेंना त्यानं टोला हाणल्यानंतर, संदीपान भुमरेही ‘लोकं तर येणारच ना’ असं म्हणतात.

हे सुद्धा वाचा

पुढे याच ऑडिओ क्लिपमध्ये तुम्ही असं करायला नाही पाहिजे होते, असं म्हणताच संदीपान भुमरे संतापल्याचं कथित ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू आलंय. उगा शहाणपणा नको करु, असं म्हणत संदीपान भुमरे यांनी शिवसैनिकाला सुनावलं. त्यानंतर पुढे त्यांनी त्यांची समजून काढत, तू भेटायला ये, तुला सगळं समजावून सांगतो, काय झालं, कशामुळे झालं, याचं स्पष्टीकरण देण्यावरुन ते युक्तिवाद करताना दिसून आलेत.

शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर आदित्य ठाकरे हे महाराष्ट्र दौऱ्यानिमित्त वेगवेगळ्या शहरांना भेटी देत आहेत. यावेळी त्यांच्या दौऱ्यादरम्यान, शिवसैनिकांचीही तुफान गर्दी पाहायला मिळाली आहे. दरम्यान, विशेष करुन बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन आदित्य ठाकरे यांच्याकडून शक्तिप्रदर्शन करण्यावर भर दिला जात असल्याची चर्चाही पाहायला मिळतेय.