Sangli Mayor Election : सांगलीत तोंडघशी पाडणाऱ्या भाजपच्या ‘त्या’ सहा नगरसेवकांना नोटीस

| Updated on: Mar 02, 2021 | 4:57 PM

सांगलीत तोंडघशी पाडणाऱ्या भाजपच्या त्या सहा नगरसेवकांना पक्षाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. (Sangli Mayor Election BJP Corporators get Notice)

Sangli Mayor Election : सांगलीत तोंडघशी पाडणाऱ्या भाजपच्या त्या सहा नगरसेवकांना नोटीस
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

सांगली : सांगली महापौर-उपमहापौर निवडणुकीत (Sangli Mayor Election) राष्ट्रवादीला सहकार्य करणाऱ्या सहा नगरसेवकांवर भाजपकडून कारवाई सुरुवात करण्यात आली आहे. सांगलीत तोंडघशी पाडणाऱ्या भाजपच्या त्या सहा नगरसेवकांना पक्षाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. भाजपचं व्हीप डावलून काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान केल्याने सदस्यांवर अपात्रतेच्या कारवाई करण्यात आली आहे. (Sangli Mayor Election BJP Corporators get Notice from the party who voted for NCP)

सांगलीचे भाजप शहर जिल्हा अध्यक्ष दीपक बाबा शिंदे आणि महापालिका गटनेते सुधीर सिंहासने यांच्याकडून सदस्यांच्या अपात्रतेच्या कारवाई करण्यासाठी हालचाली सुरु करण्यात आल्या होत्या. सांगली महापौर-उपमहापौर निवडणुकीत भाजपच्या पाच नगरसेवकांनी व्हीप डावलून काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान केलं होतं, तर 2 नगरसेवक गैरहजर राहिले होते.

दरम्यान सांगली महापौर निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत करणाऱ्या सहा भाजप नगरसेवकांना पक्षाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. तर सहयोगी नगरसेवक घाडगे बाबत ही वकिलांशी चर्चा करून कारवाई करणार आहे. भाजपा जिल्हा अध्यक्ष दीपक बाबा शिंदे यांनी याबाबची माहिती दिली आहे.

महापौरपदाच्या निवडणुकीत काय झालं?

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगलीत भाजपला आस्मान दाखवलं. सांगली मिरज कुपवाड महापालिकेत सत्तापरिवर्तन करण्यात राष्ट्रवादीला यश आलं आहे. सांगली मिरज कुपवाड महापालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा झेंडा फडकला असून महापौरपदी राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी (Digvijay Suryavanshi) यांची निवड झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना जोरदार धक्का मानला जात आहे. (Sangli Mayor Election BJP Corporators get Notice from the party who voted for NCP)

राष्ट्रवादीचे उमेदवार दिग्विजय सुर्यवंशी यांनी भाजप उमेदवार धीरज सुर्यवंशी यांचा 3 मतांनी पराभव केला. भाजपची पाच मतं फोडण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला यश आलं. तर दोन नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने आघाडीच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी यांना 39 मतं मिळाली, तर भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांना मिळाली 36 मतं पडली.

फोडाफोडीच्या शक्यतेमुळे उत्सुकता शिगेला

चार उमेदवारांपैकी दोघांनी माघार घेतल्यामुळे सांगली महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी आणि भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांच्यात मुख्य लढत झाली. नगरसेवक फोडाफोडीच्या शक्यतेमुळे महापौरपदाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. भाजपचे सात नगरसेवक अंतिम क्षणापर्यंत नॉट रिचेबल होते. त्यामुळे बहुमत असूनही भाजपला सत्ता टिकवण्यासाठी धडपड करावी लागली, जी अखेर व्यर्थ ठरली.

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेतील पक्षीय बलाबल (एकूण जागा – 78)