Video: आदित्य ठाकरेंचे डोळे दिसतील तर मिळवतील, शिवसेना बंडखोर आमदार संजय गायकवाड यांचा खोचक टोला

| Updated on: Jul 05, 2022 | 3:09 PM

शिवसेनेतील बंड पाहून खासदार संजय राऊत यांनी यातील आमदारांवर खालच्या पातळीवर टिका केली. काहींचे बाप काढले तसे आम्हीही त्यांचे बाप काढू शकतो, आम्ही 42 आमदारांनी संजय राऊत यांना मतदान केलं, त्यामुळे त्यांनी सांगाव आता हे 42 आमदार त्यांचे बाप आहेत का? त्यांनी आधी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि नंतर बोलावं.

Video: आदित्य ठाकरेंचे डोळे दिसतील तर मिळवतील, शिवसेना बंडखोर आमदार संजय गायकवाड यांचा खोचक टोला
आ. संजय गायकवाड यांनी आ. आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवली
Follow us on

बुलडाणा:  (Rebel MLA) बंडखोर आमदार हे डोळ्यात- डोळे घालून बोलू शकणार नाहीत असे विधान आ. आदित्य ठाकरे यांनी आमदारांच्या भूमिकेनंतर केले होते. शिवाय त्याचा प्रत्ययही  विधानसभेत बहुमत चाचणी दरम्यान आला. खरोखरच प्रकाश सूर्वे हे (Aaditya Thackeray ) आदित्य ठाकरे यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकले नाहीत. पण (Sanjay Gaikwad) संजय गायकवाड यांनी मात्र, मतदार संघात येताच आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवण्यास सुरवात केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या त्या विधानाबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले की, त्यांचे डोळे दिसले तर डोळ्यात डोळे घालता येतील ना. त्यामुळे एकीकडे प्रकाश सूर्वे यांच्याबरोबरचा त्यांचा भावनिक क्षण आणि आता आमदाराकडून उडवलेली खिल्ली असे दोन प्रकार दोन दिवसांमध्ये समोर आले आहेत.

बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो राहणारच

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावता येणार नाही, असे शिवसेनेने म्हटल्यावर प्रबोधनकार ठाकरे यांनी 1966 ला शिवसेनेची स्थापना केली, त्यावेळी त्यांनी जाहीर पणे सांगितले होते की, हा माझा बाळ मी माझ्या राष्ट्राला अर्पण करत आहे. बाळासाहेब ठाकरे हे देशातील 32 राष्ट्रपुरुषांपैकी एक राष्ट्रपुरुष आहे.. त्यामुळे राष्ट्रपुरुष कोणाच्या बापाचा नसतो… तो देशा चा असतो.. त्यामुळे आमच्या बॅनर तसेच जे काही कार्यक्रम असतील त्याच्यावर बाळासाहेबांचा फोटो असणार म्हणजे असणार , त्याला कोणीही विरोध करू शकत नाही. त्यामुळे ते आमच्या बॅनरवर कायम राहणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

संजय राऊतांवर मात्र सडकून टिका

शिवसेनेतील बंड पाहून खासदार संजय राऊत यांनी यातील आमदारांवर खालच्या पातळीवर टिका केली. काहींचे बाप काढले तसे आम्हीही त्यांचे बाप काढू शकतो, आम्ही 42 आमदारांनी संजय राऊत यांना मतदान केलं, त्यामुळे त्यांनी सांगाव आता हे 42 आमदार त्यांचे बाप आहेत का? त्यांनी आधी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि नंतर बोलावं. शिवाय संजय राऊत हे राष्ट्रवादीची सुपारी घेऊन शिवसेना संपवायला निघाले होते, असाही आरोप संजय गायकवाड यांनी केला.

हे सुद्धा वाचा

राऊत यांची राष्ट्रवादीशी जवळीक

सर्वच बंडखोर आमदारांचे विचार आणि मत हे एकच आहे. महाविकास आघाडीमधून बाहेर पडा हाच सर्वांचाच नारा आहे. असे असताना महाविकास आघाडीचा हट्ट सोडला जात नाही. कारण संजय राऊत आणि राष्ट्रवादी यांची जवळीक आहे. त्यामुळेच हळूहळू त्यांना हिंदुत्वाचा विसर पडत होता. शिवाय याचे भविष्यात खूप मोठे परिणाम झाले असते म्हणूनच बंडाची भूमिका घेतल्याचे गायकवाड म्हणाले.