Sanjay Raothod : क्लीन चिट मिळाल्यानेच मंत्रिपदाची संधी, यापुढे काहीही बोलल्यास कायदेशीर पाऊल उचलणार, संजय राठोडांचा इशारा

| Updated on: Aug 10, 2022 | 6:09 PM

मला पोलिसांनी क्लीन चिट दिल्यानंतरच मी मंत्री झालो आहे. या प्रकरणात यापुढे कोणी काही माझ्यावरती आरोप करेल, तर त्याबाबत कायदेशीर पाऊल उचलले, असा थेट इशारा त्यांनी टीकाकारांना दिलाय.

Sanjay Raothod : क्लीन चिट मिळाल्यानेच मंत्रिपदाची संधी, यापुढे काहीही बोलल्यास कायदेशीर पाऊल उचलणार, संजय राठोडांचा इशारा
क्लीन चिट मिळाल्यानेच मंत्रिपदाची संधी, यापुढे काहीही बोलल्यास कायदेशीर पाऊल उचलणार, संजय राठोडांचा इशारा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : तब्बल 39 दिवसानंतर एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) काल अखेर पार पडला. मात्र या मंत्रिमंडळ विस्थानानंतर ही राज्यच्या राजकारणात उडणाऱ्या ठिणग्या अजूनही थांबल्या नाहीत आणि त्याला कारण ठरले मंत्रिमंडळात समावेश असणारे आरोप असणारे नेते. त्यात पहिलं नाव आलं ते म्हणजे मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचं, गेल्या मंत्रिमंडळात असताना एका प्रकरणात आरोप झाल्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा देऊन बाहेर पडावं लागलं होतं. मात्र आता सरकार बदलल्यानंतर राठोड पुन्हा नव्या मंत्रिमंडळात दिसले आणि यावरूनच विरोधक पेटवून उठले. विरोधकच सोडा मात्र सत्तेत शिवसेनेसोबत असलेल्या भाजपमधूनच चित्रा वाघ या संजय राठोडांविरोधात पेटून उठल्या आणि मंत्रिमंडळाची शपथ घेताच काही तासात त्यांनी राठोडांनर टीकेचे बाण सोडले. त्यानंतर या टीकेला संजय राठोड यांनी आज मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच प्रत्युत्तर दिलंय. मला पोलिसांनी क्लीन चिट दिल्यानंतरच मी मंत्री झालो आहे. या प्रकरणात यापुढे कोणी काही माझ्यावरती आरोप करेल, तर त्याबाबत कायदेशीर पाऊल उचलले, असा थेट इशारा त्यांनी टीकाकारांना दिलाय.

राठोड नेमकं काय म्हणाले?

याबाबत बोलताना संजय राठोड म्हणाले, मी चार वेळा विधिमडंळचा सदस्य झालेलो आहे. आज ज्या समाजातून येतो, मोठ्या मताने चार वेळा निवडणून आलो. आता मला मंत्रिपदाची संधी मिळाली, गेल्या वेळीही मिळाली होती. एक घटना जी दुर्देवी झाली, त्यावरुन आरोप झाले. नैतिक जबाबदारी समजून, निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी उद्धव ठाकरेंकडे राजीनामा दिला. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर, पोलिसांनी मला क्लीन चिट दिली आहे. या चौकशीच्या माध्यमातून सर्व बाबी मांडलेल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

म्हणून मला शपथ दिली…

तसेच १५ महिने ज्या मानसिक तणावात मी आणि कुटुंब होतं, तसं कुणीही जाऊ नये. आज गेली ३० वर्षे राजकीयच, सामाजिक जीवनात वावरत आलेलो आहे. अशावेळी राजकीय करिअर उध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला. त्याला मी सामोरे गेलो. मंत्री असताना चौकशी करा, अशी भूमिका घेतली नाही. पोलिसांनी या प्रकरणात राजपत्र प्रकाशित केलेलं आहे. मी निष्कलंक आहे. मी त्यात सहभागी असल्याचं आढळलं नाही. म्हणून मला शपथ देण्यात आली, असे स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

कायदेशीर पाऊल उचलण्याचा इशारा

तर लोकशाहीत सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. चितत्राताईंना सर्व कागदपत्रे पाठवू, त्यांना माहित नसेल. सर्वांना विनंती आहे, याचा त्रास समजून घ्यावा ही सर्वांना विनंती आहे. आतापर्यंत मी शांत होतो. आता यापुढे कायदेशीर मार्ग अवलंबवणार, कायदेशीर नोटीस देणार दोन वेळा पुणे कोर्टाने एफआयआर दाखल करण्याचे अर्ज फेटाळले होते. ही चौकशी निष्पक्षपणे झालेली आहे. लोकशाहीत कुणी काय बोलावं, हे पाहायला हवं, असा इशाराही त्यांनी दिलाय.

चित्रा वाघ काय म्हणाल्या होत्या तेही ऐका…