Raj Thackeray: राज यांच्या अयोध्या दौऱ्याची सत्ताधाऱ्यांनी उडवली खिल्ली, राष्ट्रवादी म्हणाली तूर्तास भोंगा बंद, तर राऊत म्हणतात…

Raj Thackeray: राज यांच्या अयोध्या दौऱ्याची सत्ताधाऱ्यांनी उडवली खिल्ली, राष्ट्रवादी म्हणाली तूर्तास भोंगा बंद, तर राऊत म्हणतात...
राज ठाकरेंच्या उद्याच्या सभेचे टिझर पे टिझर, पिक्चर अभी बाकी है, सभेला पोलिसांची परवानगीही मिळाली
Image Credit source: tv9 marathi

Raj Thackeray: राज ठाकरे यांचा दौरा स्थगित झाल्यानंतर सर्वात आधी शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. अयोध्येत शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे.

भीमराव गवळी

|

May 21, 2022 | 1:41 PM

मुंबई: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अयोध्या दौरा तूर्तास स्थिगत केला आहे. भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता. त्यामुळे राज यांच्यावर जोरदार टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना आणि राष्ट्रवादीने (ncp) मनसेची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीने तर मनसेचा तूर्तास भोंगा बंद अशी टीका केली आहे. तर, वाराणासी आणि अयोध्येत शिवसेनेचे मदत कक्ष आहेत. राज ठाकरेंना काही मदत लागली असती तर आम्ही त्यांना दिली असती, अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केली आहे. तर आमचे नगरसेवक चोरणारे आम्हाला काय मदत करणार असं प्रत्युत्तर मनसेने दिलं आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षात राज यांच्या अयोध्या दौऱ्यावरून कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळत आहे.

तर राज यांना मदत केली असती

राज ठाकरे यांचा दौरा स्थगित झाल्यानंतर सर्वात आधी शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. अयोध्येत शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांना काही मदत हवी होती तर त्यांनी आम्हाला सांगायला हवं होतं. मदत दिली असती. लोक तिर्थयात्रेला जाताना यात्रेत अडचणी येतात. तेव्हा लोक शिवसेनेच्या मदत कक्षाकडे मदतीची मागणी करतात. वाराणासी आणि अयोध्येत शिवसेनेचे मदत कक्ष आहेत. त्यांनी त्यांचा अयोध्या दौरा रद्द केला आहे. त्यांनी मदत मागितली असती तर दिली असती, असा चिमटा राऊत यांनी काढला.

तूर्तास भोंगा बंद

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसनेही राज यांच्या दौऱ्याची खिल्ली उडवली आहे. तूर्तास अयोध्या दौऱ्याचा भोंगा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटविण्यासाठी नवीन भोंगा कोणता लावावा यावर विचारविनिमय सुरू आहे. सविस्तर बोलूच…, असं ट्विट राष्ट्रवादीने केलं आहे.

मनसेचा इशारा

राज ठाकरे यांच्या दौऱ्यावर टीका करणाऱ्यांवर मनसेने टीका केली आहे. मनसेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून विरोधकांवर टीका केली आहे. विरोधकांनी ‘तूर्तास स्थगित’चा अर्थ लावताना नवनवीन राजकीय शोध लावू नयेत! सर्वांचा चोख हिशोब केला जाईल, पुण्यात!!, असा इशारा मनसेने दिला आहे. तर, आमचे नगरसेवक चोरणारे आम्हाला काय मदत करणार? असा सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

कदाचित त्यांची सुपारी फुटली नसेल!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नियोजित अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे. 5 जूनसाठी राज ठाकरेंना काही सहकार्य हवं असतं, तर आम्ही केलं असतं. अयोध्या दौरा कशाला रद्द केला?, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनसेला लगावला होता. यावर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी राऊत यांना जशास तसं उत्तर दिलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे दौरा रद्द झाला नाही, पुढे ढकलण्यात आला आहे. आणि आम्हाला यांची गरज नाहीये. त्यांना कदाचित दुःख वाटलं असेल, कदाचित त्यांची सुपारी फुटली नसेल. त्यांचं राजकारणाच हित साध्य झालं नसेल. पुन्हा एकदा यांना सुपारी द्यावी लागेल. त्याचं दुःख वाटलं असेल. राज साहेबांच्या तब्येतीच्या कारणास्तव हा दौरा स्थगित केला आहे. साहेब त्यांची भूमिका परवा स्पष्ट करणार आहेत, असं राजू पाटील यांनी सांगितलं.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें