तुमच्या डोळ्याला आणि कानाला त्रास व्हावा म्हणूनच माझी नियुक्ती; राऊतांचा चंद्रकांतदादांना टोला

| Updated on: Nov 30, 2020 | 11:02 AM

भाजपकडून सतत शिवसेनेवर टीका केली जात आहे. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. (Sanjay Raut Criticism BJP) 

तुमच्या डोळ्याला आणि कानाला त्रास व्हावा म्हणूनच माझी नियुक्ती; राऊतांचा चंद्रकांतदादांना टोला
Follow us on

मुंबई : “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझी नियुक्ती तुमच्या कानाला आणि डोळ्याला त्रास व्हावा म्हणून नियुक्ती केली आहे,” अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून सतत शिवसेनेवर टीका केली जात आहे. त्यावर संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. (Sanjay Raut Criticism BJP)

“महाविकासआघाडी सरकार वर्षभरात पूर्णपणे गोंधळलेले आणि अपयशी ठरले आहे. त्यामध्ये सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे. वर्षभर खुर्चीसाठी धडपड, त्यासाठी वाट्टेल तो अपमान सहन करायचा. सकाळी भांडायचे, मग भाजप पुन्हा सत्तेत येईल म्हणून संध्याकाळी सामोपचाराने एकत्र यायचे, अशा पद्धतीने महाविकासआघाडी सरकार चालविले जात आहे,” अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली होती.

“सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर टीका करताना ‘चंपा’, ‘टरबुज्या’ अशा पद्धतीची भाषा वापरली जात आहे. मग आम्हीही उद्धव ठाकरे यांना ‘उठा’, शरद पवार यांना ‘शपा’, जयंत पाटील यांना ‘जपा’ म्हणायचे का?,” असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला. यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझी नियुक्ती तुमच्या कानाला आणि डोळ्याला त्रास व्हावा म्हणून नियुक्ती केली आहे,” असे संजय राऊत म्हणाले.

बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उद्या (1 डिसेंबर) शिवसेनेत प्रवेश करणार आहे. नुकतंच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याबाबतची माहिती दिली आहे. लवकरच उर्मिला मातोंडकर या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतील असेही म्हटलं जात आहे. त्यानंतर उद्या पत्रकार परिषद घेत उर्मिला शिवसेना प्रवेशाबाबत अधिकृतरित्या माहिती देतील, असे सांगितले जात आहे.

“उर्मिला या शिवसेनेतच आहेत. त्या बहुतेक उद्या प्रवेश करतील, असं वाटतं आहे. ही चांगली गोष्ट आहे. त्यांच्यामुळे आमची महिला आघाडी मजबूत होईल,” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.  (Sanjay Raut Criticism BJP)

संबंधित बातम्या : 

चंद्रकांत पाटलांनी कधी आंदोलन केलंय का, जेलमध्ये गेलेत का; जयसिंगराव गायकवाडांचा हल्लाबोल

तीन पक्षांनी एकत्र यावं ही माझी 2014 पासूनची इच्छा, पण तेव्हा पवारांनी जनमताचा विचार केला : नवाब मलिक