“चंद्रकांत पाटील कन्नडमध्ये राष्ट्रगीत म्हणतात”, संजय राऊत यांचा घणाघात

कर्नाटक सीमाप्रश्नावरून संजय राऊत आक्रमक

चंद्रकांत पाटील कन्नडमध्ये राष्ट्रगीत म्हणतात, संजय राऊत यांचा घणाघात
| Updated on: Nov 24, 2022 | 11:12 AM

मुंबई : संजय राऊत यांनी भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. चंद्रकांत पाटील कन्नडमध्ये राष्ट्रगीत म्हणतात आणि आमच्या जखमेवर मीठ चोळतात, असं म्हणत त्यांनी संजय राऊतांनी (Sanjay Raut) हल्लाबोल केलाय.

एक राज्य आमचे उद्योग खेचून घ्यायचा प्रयत्न करतो. एक राज्य आमची गावं घेण्याचा प्रयत्न करतो. आमचे मुख्यमंत्री, मंत्री सीमाभागात जात नाहीत. चंद्रकांत पाटील जातात आणि कन्नडमध्ये राष्ट्रगीत म्हणतात. कर्नाटकचंच कौतुक करून येतात. हा आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. आम्ही जाऊ आणि आम्ही लढू, असं संजय राऊत म्हणालेत.

प्राण गेला तरी हरकत नाही पण कर्नाटक सीमा प्रश्नासाठी आम्ही लढू, असं राऊतांनी सांगितलं आहे.

कर्नाटक सीमा प्रश्नावरून राऊत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. शिंदे-फडणवीस सरकारवर त्यांनी टीकास्त्र डागलंय.

संजय राऊतांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतलाय. निवडणूक आयोग दबावाखाली काम करतंय. याचा अनुभव आमच्या पक्षाने घेतलाय. आमचं पक्ष चिन्ह गोठवण्यात आलं. बाळासाहेब ठाकरेंनी उभ्या केलेल्या शिवसेना पक्षाचं नाव गोठवण्यात आलं. यावरून निवडणूक आयोगाच्या कामाकाजाची छबी दिसते. ते केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करत आहे, असं राऊत म्हणाले.