सत्तास्थापनेसंदर्भात मी दोन दिवसात राज्यपालांना भेटणार : संजय राऊत

| Updated on: Nov 04, 2019 | 7:46 AM

राज्याला लवकरात लवकर स्थिर सरकार कसे मिळेल याबाबतही मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे, असेही संजय राऊत (Sanjay Raut meet Governer Bhagat Singh Koshyari) म्हणाले."

सत्तास्थापनेसंदर्भात मी दोन दिवसात राज्यपालांना भेटणार : संजय राऊत
Follow us on

मुंबई : “येत्या दोन दिवसात मी स्वत: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची सत्तास्थापनेसंदर्भात भेट (Sanjay Raut meet Governer Bhagat Singh Koshyari) घेणार आहे. त्यावेळी सत्तास्थापनेची प्रक्रिया लवकर सुरु करा. अशी विनंती मी त्यांना करणार आहे,” अशी माहिती शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी टीव्ही 9 न्यूजरुम स्ट्राईक (Sanjay Raut meet Governer Bhagat Singh Koshyari) कार्यक्रमादरम्यान दिली. “राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल अशी भाषा कोणीही करु नये. त्यामुळे राज्यात अस्थिरता निर्माण होईल,” असेही ते यावेळी म्हणाले.

“निवडणुकांचा निकाल लागल्यानंतरही सरकार स्थापन होत नाही. त्यामुळे आपण सरकार स्थापनेचा निर्णय घेणे गरजेचे आहे मी पक्षातर्फे राज्यपालांना भेटणार आहे. राज्याला लवकरात लवकर स्थिर सरकार कसे मिळेल याबाबतही मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे, असेही संजय राऊत (Sanjay Raut meet Governer Bhagat Singh Koshyari) म्हणाले.”

“राष्ट्रपती आणि राज्यपालांवर घटनेने ही जबाबदारी टाकलेली आहे. राज्यात स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी मोठ्या पक्षाला आमंत्रित करणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्यापालांकडे जाऊन कोणत्याही मोठ्या पक्षाला आमंत्रित करा हे मी सांगणार आहे. एक मोठा पक्ष नाही आला, तर दुसऱ्या मोठ्या पक्षाला बोलवायचं का हा निर्णय राज्यपाल ठरवतील,” असेही संजय राऊत म्हणाले.

“घटना, संविधान, विधी मंडळाचे कायदे असतात. त्यानुसार राज्यपालांना हा निर्णय घ्यायचा असता. सर्वात मोठ्या पक्षाला निमंत्रित करायचा निर्णय राज्यपालांकडे असतो. त्यामुळे त्यांनी तो घ्यावा,” असेही ते यावेळी (Sanjay Raut meet Governer Bhagat Singh Koshyari) म्हणाले.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करायला तो काय चिवडा आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. तसेच राष्ट्रपती बाजारात विकायला ठेवलेली वस्तू नाही, असंही राऊत (Sanjay Raut on President rule in Maharashtra) यांनी नमूद केलं.

“कुणी बाजारातून आणावा आणि वाटावा याप्रमाणे राष्ट्रपती शासन म्हणजे काय गल्लीतील चिवडा आहे का? देशात राष्ट्रपती ही काही बाजारात विकायला ठेवलेली वस्तू नाही. जर पहिल्या मोठ्या पक्षाला सरकार स्थापन करता आलं नाही, तर दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या पक्षाला सत्तास्थापनेसाठी बोलवावं लागेल. राज्यपाल राज्यातील प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी चर्चाही करु शकतात. त्यांच्याशी बोलून इतर पर्यायांची चाचपणी करु शकतात.” असेही संजय राऊत यावेळी (Sanjay Raut meet Governer Bhagat Singh Koshyari) म्हणाले.

“भाजपने विधानसभा निवडणुकीत बंडखोरांना ताकद दिल्याने आमच्या 20-22 जागा पडल्या. या बंडखोरीत दोन्ही पक्षांचे नुकसान झाले. स्वतंत्र लढलो असतो तर फायदा झाला असता,” असंही संजय राऊत यांनी नमूद केलं.

“विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्या दिवशी भाजप-शिवसेनेने राज्यपालांकडं दावा सादर करायला हवा होता. मात्र, तसं झालं नाही. आम्ही एकत्र बसून जायला हवं अशी तयारी करत होतो. मात्र, तसं झालं नाही त्याला शिवसेना जबाबदार नाही. भाजपला 105 जागा मिळाल्या आहेत. तो सर्वात मोठा पक्ष होता. दोघांनी दावा करायला हवा होता. मात्र, युती करताना काही गोष्टी ठरल्या होत्या. अडीच-अडीच वर्ष महत्त्वाच्या पदांची वाटप झाली होती. तसं ठरल्याप्रमाणे सत्तावाटप करायला हवं. आम्ही ठरल्यापेक्षा काहीही अधिक मागत नाही,” असंही संजय राऊत यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या : 

राष्ट्रपती राजवट लागू करायला काय तो चिवडा आहे का? : संजय राऊत