AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shahu maharaj : संजय राऊतांनी घेतली श्रीमंत शाहू महाराजांची भेट, भेटीनंतर मराठा संघटनांचे तिखट सवाल

पत्रकार परिषद घेत संभाजीराजेंनी माघार घेतली. तसेच उद्धव ठाकरे यांनी शब्द फिरवला म्हणत हल्लाबोल चढवला. मात्र कालच श्रीमंत शाहू महाराजांनी त्यांचे कान टोचले. त्यानंतर संजय राऊतांनी हा सगळा भाजपचा डाव होता म्हणत भाजपवर हल्लाबोल चढवला . तसेच आज त्यांनी जाऊन श्रीमंत शाहू महाराजांची भेटही घेतली आहे.

Shahu maharaj : संजय राऊतांनी घेतली श्रीमंत शाहू महाराजांची भेट, भेटीनंतर मराठा संघटनांचे तिखट सवाल
संजय राऊतांनी घेतली श्रीमंत शाहू महाराजांची भेटImage Credit source: tv9
| Updated on: May 29, 2022 | 5:33 PM
Share

कोल्हापूर : राज्यात जेव्हापासून राज्यसभेची निवडणूक (Rjyasabha Election) जाहीर झाली तेव्हापासून जोरदार पॉलिटिकल गदारोळ झाला. कारण सहाव्या जागेने या निवडणुकीचा सस्पेन्स वाढवा होता. या जागेवर लढण्यासाठी अपक्ष म्हणून संभाजीराजे (Chatrapati Sambhajiraje) पुढे आले. तर दुसरीकडे शिवसेनेने (Shivsena) सहावी जागा आम्ही लढवणार असचा पवित्रा घेतला. राजे शिवसेनेकडून लढावे किंवा राजेंना शिवसेनेने पाठिंबा द्यावा यासाठी अनेक बैठका पार पडल्या. मात्र त्यातूनही तोडगा निघाला नाही. कारण राजेंटी अट सेनेला मान्य नव्हती. तर सेनेची अट राजेंना मान्य नव्हती. त्यामुळे शेवटी शिवसेनेने या जागेवरून संजय पवार यांना उमेदवारी दिली. मात्र दुसऱ्याच दिवशी पत्रकार परिषद घेत संभाजीराजेंनी माघार घेतली. तसेच उद्धव ठाकरे यांनी शब्द फिरवला म्हणत हल्लाबोल चढवला. मात्र कालच श्रीमंत शाहू महाराजांनी त्यांचे कान टोचले. त्यानंतर संजय राऊतांनी हा सगळा भाजपचा डाव होता म्हणत भाजपवर हल्लाबोल चढवला . तसेच आज त्यांनी जाऊन श्रीमंत शाहू महाराजांची भेटही घेतली आहे.

संजय राऊत यांनी घेतली शाहू राजेंची भेट

या भेटीबाबत संजय राऊतांनी ट्विट करत माहिती दिली आहे.  श्रीमंत छत्रपती आदरणीय शाहू महाराज यांची आज कोल्हापूरच्या राजवाड्यात जाऊन भेट घेतली. दिलखुलास चर्चा झाली. शाहू महाराजांचे आशिर्वाद मोलाचे आहेत, असे ट्विट राऊतांनी केले आहे.

भेटीनंतर राऊतांचं ट्विट

संभाजीराजेंनी शनिवारी केलेलं ट्विट

भेटीनंतर मराठा संघटनांचे तिखट सवाल

या भेटीनंतर आणि या राजकीय घडामोडींनंतर मराठा क्रांती मोर्च्याच्या राजेंद्र कोंढरे यांनी काही तिखट सवाल केले आहेत. राज्यसभेची उमेदवारी नाकारल्याने घराण्याचा अवमान होत नाही असे मत शाहू छत्रपतींचे असेल तर ज्या घराण्याने अठरा पगड जाती धर्माच्या मुलासाठी वसतीगृहे बांधून त्याच्या तजविजीसाठी शेकडो एकर जमीन दान केली . त्यांच्या वारसाला मराठा समाजाच्या शासकीय वसतिगृहांच्या जमिनीसाठी आजाद मैदानावर आमरण उपोषण करावं लागतं तो पण या घराण्याचा या सरकारने केलेला सन्मान समजायचा का ? वंशजांचा पुरावा मागणाऱ्यांचा पाहुणचार केला म्हणून ??? असा सवाल त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे केले आहे. त्यामुळे राजकारणात सध्या या भेटीवरूनही जोरदार राजकारण रंगताना दिसत आहे. आता हे कधी थांबणार? हे एवढ्यात तरी सांगणं कठीण आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.