AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बेळगाव कोर्टाच्या समन्सला वकील उत्तर देणार, मी उपस्थित राहणार नाही- संजय राऊत

संजय राऊत यांचा माध्यमांशी संवाद, काय म्हणाले? पाहा...

बेळगाव कोर्टाच्या समन्सला वकील उत्तर देणार, मी उपस्थित राहणार नाही- संजय राऊत
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Nov 30, 2022 | 11:18 AM
Share

मुंबई : कर्नाटक न्यायालय समन्सला माझे वकील उत्तर देतील. मी उद्याच्या सुनावणीला उपस्थित राहणार नाही. पुढच्या सुनावणीला मी जाईल, असं खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणालेत. कर्नाटक सीमावादावर सुनावणी झाली तर होईल. आम्ही सगळेच या सुनावणीची वाट पाहातोय. कर्नाटकचे मुख्यमंत्री दिल्लीला ठाण मांडून बसलेले आहेत. आमचे मुख्यमंत्री कुठे आहेत? हा मोठा प्रश्न आहे, असं म्हणत कर्नाटक सीमाप्रश्नी राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे.

30 मार्च 2018 ला संजय राऊतांनी कर्नाटकात भाषण केलं होतं. हे भाषण प्रक्षोभक असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी राऊत यांना समन्स बजावण्यात आलं आहे. 1 डिसेंबरला संजय राऊत यांना बेळगाव कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावर बोलताना राऊतांनी आपण या सुनावणीला हजर राहणार नसल्याचं म्हटलंय.

काल बोलताना संजय राऊत यांनी हल्ला आणि अटकेचा कट असल्याचं म्हटलं होतं. आपण सुनावणीला जाणार नसल्याचं राऊतांनी स्पष्ट केलंय.

शिवप्रताप दिनाचा उत्सव हा महाराष्ट्रात दरवर्षी होत असतो. शिवप्रताप दिनाचा महत्त्व समजून घ्यायला हवं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमाननंतर आपण राज्यपालांचा धिक्कार केला असता आणि राजभवनातून परत जाण्याची मागणी केली असती तर आजच्या शिवप्रताप दिनाचे महत्त्व अजून वाढलं असतं, असंही राऊत म्हणालेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे राज्यपाल अजून राजभवनातच आहेत. सरकार तोंड शिवून गप्प बसलंय, हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारं नाही, असंही राऊत म्हणालेत.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...