नेहरूंनी देशाचा विकास केला, अन्यथा भारताचा पाकिस्तान झाला असता- संजय राऊत

खासदार संजय राऊत यांनी नेहरू, सावरकर वादावर प्रतिक्रिया दिली आहे.

नेहरूंनी देशाचा विकास केला, अन्यथा भारताचा पाकिस्तान झाला असता- संजय राऊत
Follow us
| Updated on: Nov 19, 2022 | 12:49 PM

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर (Vinayak Savarkar) यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण तापलं आहे.अशात देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Neharu) यांच्यावरही टीकेची झोड उठली आहे. दोन्ही बाजूने दावे प्रतिदावे केले जात आहेत. या वादावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जवाहरलाल नेहरू यांनी देशाच्या प्रगतीसाठी काम केलं. स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा मोठा वाटा राहिलाय.त्यांनी कायम देशाच्या विकासाचा ध्यास घेतला. स्वातंत्र्यावीर सावरकर विज्ञाननिष्ठ होते. त्या दिशेला देशाला घेऊन जाण्याचं काम नेहरूंनी केलं. त्यांनी ते काम केलं नसतं तर या देशाचाही पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता, असं संजय राऊतांनी म्हटलंय.

सावरकर आणि नेहरू यांनी देशासाठी अमुल्य योगदान दिलं आहे. या दोघांचं कार्य मोठं आहे. पण या दोघांवर सध्या टीका होतेय. हे होता कामा नये. दोघांभोवतीचं राजकारण थांबायला पाहिजे, असं राऊत म्हणालेत.

संजय राऊतांच्या बोलण्याचा हाच सूर आजच्या सामनाच्या अग्रेलखाही पाहायला मिळाला. “गेल्या आठ वर्षांपासून केंद्रात भाजपचे सरकार आहे, पण वीर सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी शिवसेना करीत असताना हे लोक बहिऱ्याची भूमिका वठवतात . यास ढोंग नाही म्हणायचे तर काय ? वीर सावरकरांचा सन्मान होईल असे एकही काम फडणवीस – मोदी यांनी केले नाही”, असं सामनात म्हणण्यात आलंय.

“राहुल गांधी यांनी सावरकरांच्या माफीचा विषय काढताच भाजपवाल्यांचे निषेधाचे नागोबा बिळातून बाहेर पडतात व फूत्कार सोडतात , पण ही संधी या नागोबांना राहुल गांधी वारंवार का देतात?, हाच संशोधनाचा विषय आहे! महाराष्ट्र वीर सावरकरांना मानतो , आदर करतो . त्यांच्या शौर्याचा सन्मान करतो , करत राहील!”, असं म्हणत राहुल गांधींच्या विधानावरही भाष्य करण्यात आलंय.

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.