AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MLC Election 2022 : “चमत्कारावर विश्वास तर लक्ष्मण जगताप-मुक्ता टिळक यांच्या जीवाशी खेळ का?”, सामनातून सवाल संजय राऊतांचा सवाल

देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर भाजप नेत्यांनी जिंकण्याचा आत्मविश्वास बोलून दाखवला आहे. राज्यसभेसारखाच विधान परिषद निवडणुकीतही असाच चमत्कार होईल, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं. त्यावरच सामनाच्या आजच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलंय.

MLC Election 2022 : चमत्कारावर विश्वास तर लक्ष्मण जगताप-मुक्ता टिळक यांच्या जीवाशी खेळ का?, सामनातून सवाल संजय राऊतांचा सवाल
| Updated on: Jun 20, 2022 | 7:12 AM
Share

मुंबई : आज विधान परिषद निवडणूक (Legislative Council Elections) होतेय. सगळेच राजकीय पक्ष कंबर कसून तयार आहेत. राज्यसभेला भाजपने महाविकास आघाडीला पराभवाची धूळ चारली. त्यानंतर आता पुन्हा एकदा मविआला आम्ही चितपट करू असा चंग देवेंद्र फडणवसांनी बांधला आहे. अश्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसही या सामन्यासाठी विशेष तयारीनिशी सज्ज झाली आहे. जिंकणार तर आम्हीच असा दृढ आत्मविश्वास आघाडीला आहे. याचपार्श्वभूमीवर सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. “चमत्कारावर विश्वास तर लक्ष्मण जगताप-मुक्ता टिळक यांच्या जीवाशी खेळ का?”, असा सवाल संजय राऊतांनी (Sanjay Raut) सामनातून विचारला आहे.

देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर भाजप नेत्यांनी जिंकण्याचा आत्मविश्वास बोलून दाखवला आहे. राज्यसभेसारखाच विधान परिषद निवडणुकीतही असाच चमत्कार होईल, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं. त्यावरच सामनाच्या आजच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलंय.

याचेच नाव चमत्कार!

“पंतप्रधान मोदी संत तुकारामांच्या देहू गावी अवतरले व संतांची पगडी घालून म्हणाले, “भेदाभेदी नको”, पण भेदाभेदीचे टोक त्यांच्याच काळात गाठले आहे. मलिक-देशमुखांना मतदानाची परवानगी नाही, हे भेदाभेदीचेच राजकारण. पण त्याच वेळेला लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक या दोन आजारी आमदारांना अत्यंत नाजूक स्थितीत मतदानास उचलून आणले जाते. हे दोन्ही आमदार कर्करोगाशी झुंजत आहेत. व्हेंटिलेटरवर त्यांचा श्वास आहे असे म्हणतात, पण राजकीय स्वार्थ असला की, माणुसकी तुडवून त्यांना स्ट्रेचर व व्हीलचेअरवर मतांसाठी आणले जाते. विजयाची किंवा चमत्काराची इतकीच खात्री असताना हे अमानुष, अघोरी प्रयोग कशासाठी? पण राजकीय फायद्यासाठी भाजप कोणत्याही अमानुष थरापर्यंत घसरू शकतो. याचेच नाव चमत्कार!”, असं सामनाच्या अग्रलेखातून म्हणण्यात आलंय.

आज सोनियाचा दिनू

सर्वच राजकीय पक्षांसाठी आज सोनियाचा दिनू आहे, असं म्हणता येईल. कारण राज्यसभा निवडणुकीमनंतर आज विधान परिषदेची निवडणूक पार पडतीये. 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. सर्वच पक्ष विजयाचा दावा करत आहेत. अश्यात कोण बाजी मारणार याकडे महाराष्ट्राच्या नजरा आहेत.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.