महाराष्ट्राच्या कॅनव्हासमध्ये रंग भरणारा ब्रश उद्धव ठाकरेंच्या हाती : राऊत

उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात, हे महाराष्ट्राला लवकरच कळेल, शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

महाराष्ट्राच्या कॅनव्हासमध्ये रंग भरणारा ब्रश उद्धव ठाकरेंच्या हाती : राऊत
Follow us
| Updated on: Oct 27, 2019 | 5:03 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या कॅनव्हासमध्ये जो रंग भरणार आहे, तो स्ट्रोक, तो ब्रश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हाती आहे, असं खासदार संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं. शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचंही राऊत यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना स्पष्ट (Sanjay Raut on Shivsena BJP alliance) केलं.

ब्रश उद्धवजींच्या हातामध्ये आहे, रंग आम्ही बदलणार. काही काळजी करु नका, शिवसेनेला कोणतीही अडचण नाही. अन्य पर्याय काय आहेत, उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात, हे महाराष्ट्राला लवकरच कळेल, असं संजय राऊत यांनी सांगितलं. शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे.

शिवसेनेची ताकद वाढणार आहे. काल तिघा आमदारांनी पाठिंबा दिला आहे. शिवसेनाला भविष्यात जास्त समर्थन मिळेल. लवकरच काही लोक मातोश्रीवर दिसतील. हे संकेत देत नाही, तर मी स्पष्ट करत आहे, असंही राऊत म्हणाले.

सत्ता स्थापनेमध्ये यंदा 50 टक्के वाटा देण्यात यावा, यासाठी शिवसेनेने भाजपवर दबावतंत्र टाकण्यास सुरुवात केली आहे. राज्यात अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना ठाम आहे. मात्र भाजपकडून शिवसेनेची उपमुख्यमंत्रिपदावर बोळवण होण्याची शक्यता असल्यामुळे सेनेने लेखी आश्वासन (Sanjay Raut on Shivsena BJP alliance) मागितलं आहे.

भाजपकडून शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद मिळणार, सूत्रांची माहिती

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले आहेत, तर भाजपने 105 जागांवर बाजी मारली आहे. मात्र मॅजिक फिगर (145) गाठण्यात भाजपला अपयश आलं आहे. ‘अबकी बार 220 पार’चा नारा देणारी भाजप एकहाती सत्ता स्थापन करु शकत नाही. त्यामुळे महायुतीतील भाजप-शिवसेना संख्याबळ वाढवण्यासाठी अपक्ष आमदारांचं पाठबळ घेताना दिसत आहे.

निकालानंतर रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल आणि भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर बच्चू कडू यांनीही प्रहार जनशक्तीकडून समर्थन दिलं. त्यामुळे बच्चू कडू आणि राजकुमार पटेल यांना धरुन शिवसेना समर्थक आमदारांची संख्या 60 झाली आहे.

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.