Eknath Shinde: नेमकं काय घडलं होतं राजस्थान, मध्यप्रदेशमध्ये, ज्यामुळे काँग्रेसची सरकारं धोक्यात आली, पडली, ज्याचा उल्लेख संजय राऊत करतायत!

विधान परिषद निवडणुकीत भाजपाला मोठा विजय मिळाल्यानंतर 20 जून रोजी सोमवारी रात्रीतूनच महाराष्ट्रात मोठा राजकीय हालचाली घडल्या. शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यभरातील अनेक आमदारांनी गुजरातमधील सूरत येथील हॉटेल गाठले. गुजरात भाजपच्या मदतीनं महाविकास आघाडी सरकार धोक्यात आणण्याची खलबतं इथं सुरु आहेत.

Eknath Shinde: नेमकं काय घडलं होतं राजस्थान, मध्यप्रदेशमध्ये, ज्यामुळे काँग्रेसची सरकारं धोक्यात आली, पडली, ज्याचा उल्लेख संजय राऊत करतायत!
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी

|

Jun 21, 2022 | 12:43 PM

मुंबईः राजस्थान (Rajasthan) आणि मध्य प्रदेश (Madhya Pradesh) पॅटर्नप्रमाणे महाराष्ट्रातलं सरकार पाडण्याचं मोठं कारस्थान गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. मात्र भाजपचं हे स्वप्न पूर्ण होणार नाही. महाराष्ट्रात शिवसेना आणि महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) सरकार भक्कम आहे, आपल्या राज्यात भाजपचा हा पॅटर्न प्रभावी ठरणार नाही, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. विधान परिषद निवडणुकीत भाजपाला मोठा विजय मिळाल्यानंतर 20 जून रोजी सोमवारी रात्रीतूनच महाराष्ट्रात मोठा राजकीय हालचाली घडल्या. शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यभरातील अनेक आमदारांनी गुजरातमधील सूरत येथील हॉटेल गाठले. गुजरात भाजपच्या मदतीनं महाविकास आघाडी सरकार धोक्यात आणण्याची खलबतं इथं सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातदेखील महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी रात्रीपासूनच वरिष्ठ नेत्यांच्या बैठका सुरु आहेत. यात शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आदींसह अनेक नेत्यांचा समावेश आहे. आता राजस्थान आणि मध्य प्रदेशचा पॅटर्न महाराष्ट्रात राबवला जातोय का, याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे.

मध्य प्रदेशात काय घडलं होतं?

मध्य प्रदेशात सध्या भाजप सरकार आहे. शिवराज सिंह चौहान हे तेथील मुख्यमंत्री. या राज्यात विधान सभेच्या 230 सदस्यसंख्या आहे. 2018 मधील विधानसभा निवडणुकीत शिवराज सिंह चौहान यांना सरकार बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या पुरेशा जागा मिळाल्या नाहीत. काँग्रेसपेक्षा भाजपाला काही जागा कमी मिळाल्या. त्यामुळे 17 डिसेंबर 2018 मध्ये मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्या नेतृत्वात काँग्रेसचं सरकार स्थापन झालं. मात्र सव्वा वर्षानंतर भाजपने सरकारमध्ये खिंडार पाडलं आणि भाजपकडील आमदारांचं पारडं जड झालं. कमलनाथ सरकार पडलं आणि शिवराजसिंह चौहान यांनी चौथ्यांदा मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

राजस्थानचं ऑपरेशन लोटस काय?

राजस्थानमध्येही 2018 मध्ये वसुंधरा राजेंच्या भाजप नेतृत्वासमोर काँग्रेसचा विजय झाला. येथे आता मुख्यमंत्री अशोक गहलोत सरकारमध्ये आहेत. गेल्या काही दिवसांपासून येथील काँग्रेसमध्येही मोठ्या प्रमाणावर धुसपूस आहे. विधान सभा निवडणुकीनंतर राहुल गांधींना सचिन पायलट यांना मुख्यमंत्री बनवायचं होतं. मात्र पक्षातील अनेकांनी अशोक गहलोत यांच्या अनुभवामुळे त्यांनाच मुख्यमंत्री पदी बसवण्याचा दबाव टाकला होता. मात्र याचे उलट परिणाम दिसत असून अनेक काँग्रेस नेते गहलोत यांच्या नेतृत्वावर नाराज आहेत. काँग्रेसमधील या सर्व अस्वस्थतेमागे भाजपचा हात असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे राजस्थानमधील ऑपरेशन लोटसकडे अवघ्या देशाच्या नजरा लागल्या आहेत.

काय म्हणाले संजय राऊत?

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘ ज्या प्रकारचं चित्र निर्माण केलं जातंय. पण भूकंप होण्याची शक्यता वाटत नाही. नक्कीच काही ठिकाणी संशयास्पद वातावरण आहे. हेही दूर होईल. वर्षा बंगल्यावर बैठक आहे. आज सकाळपासून काँग्रेस, राष्ट्रवादीचे प्रमुख नेते शरद पवार, सुप्रिया सुळे आहेत. आम्ही लवकरच यावर चर्चा करणार आहोत. राजस्थान आणि मध्य प्रदेश पॅटर्नप्रमाणे उद्धव ठाकरे सराकराचं पाडावं अशा हालचाली सुरु आहेत. पण हे राज्यात चालणार नाही. या पद्धतीनं तुनम्हाला किंग मेकर होता येणार नाही. महाराष्ट्र अस्थिर करता येणार नाही. महाराष्ट्राच्या छातीवर घाव घालता येणार नाही.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें