AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : मोदी हे पक्षाचे पंतप्रधान असल्यासारखे वागतात, हा महाराष्ट्राचा अपमानच, सुप्रिया सुळेंपाठोपाठ राऊतांचाही हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पक्षाचेच प्रधानमंत्री आहेत, तसा त्यांचा वावर आहे, पुण्याच्या सुपुत्राला उपमुख्यमंत्र्यांना प्रधानमंत्री कार्यालयांने बोलू न देना ज्याप्रकारे सुप्रिया सुळे म्हणतात त्याप्रमाणे हा एक अस्वस्थ करणारा विषय आहे, असे म्हणत राऊतांनी हल्लाबोल चढवला आहे.

Sanjay Raut : मोदी हे पक्षाचे पंतप्रधान असल्यासारखे वागतात, हा महाराष्ट्राचा अपमानच, सुप्रिया सुळेंपाठोपाठ राऊतांचाही हल्लाबोल
पंतप्रधान कार्यालयाने अजित पवारांचे भाषण डावलले? Image Credit source: tv9
| Updated on: Jun 14, 2022 | 7:52 PM
Share

मुंबई : आज देहूत मोदी (PM Modi) वारकऱ्यांच्या कार्यक्रमाला आले मात्र आता त्याच कार्यक्रमात अजित पवारांना (Ajit Pawar) बोलण्याची संधी न मिळाल्याने नवा वाद पेटला आहे. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. अशा भाषेत काही वेळापूर्वीच खासदार सुप्रिया सुळे यांनी हल्लाबोल चढवला आहे. तर आता यावरून संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही सडकून टीका केली आहे. अजित पवार हे या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. या कार्यक्रमाला त्यांना विशेष निमंत्रित होते. आज त्यांना बोलू दिले नाही म्हणून पंतप्रधानांनी आश्चर्य व्यक्त केलं अशा प्रकारचे चित्र मी पाहिले. मात्र विरोधी पक्ष नेते प्रत्येक ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याविषयी आमचा आक्षेप नाही. पण त्यांना असे वाटते की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पक्षाचेच प्रधानमंत्री आहेत, तसा त्यांचा वावर आहे, पुण्याच्या सुपुत्राला उपमुख्यमंत्र्यांना प्रधानमंत्री कार्यालयांने बोलू न देना ज्याप्रकारे सुप्रिया सुळे म्हणतात त्याप्रमाणे हा एक अस्वस्थ करणारा विषय आहे, असे म्हणत राऊतांनी हल्लाबोल चढवला आहे.

राज्य सरकारला आधीच कळवायला हवं होतं

तसेच आता भाजपवाले म्हणतील की यात कसला झाला महाराष्ट्राचा अपमान ? तर  तुम्हाला बोलू दिले म्हणून सन्मान नाही, हा एक प्रकारे महाराष्ट्राचा अपमानच आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत अशा प्रकारच्या घटना वारंवार घडवल्या जात आहेत, हे मी प्रकर्षाने सांगू इच्छितो. देहू संस्थांनाने याबाबत काही खुलासे केले आहेत की प्रधानमंत्री कार्यालयांने अजित पवारांना बोलू दिले नाही. तर त्या संदर्भात संस्थानने महाराष्ट्र सरकारला कळवायला हवं होतं. शेवटच्या मिनिटाला प्रधानमंत्री कार्यालयने संस्थानला कळवलं नाही हे आधीच कळवलं होतं. असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

राष्ट्रवादीकडूनही भाजपवर जोरदार हल्लाबोल

आदित्य ठाकरेंना अडवल्यानंतर राऊत आक्रमक

पुण्यात अजित पवार यांना बोलण्याची संधी मिळाली नाही हा वाद ताजा असतानाच मुंबईत दुसरा वाद पाहायला मिळाला. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधानांच्या स्वागताला जात असताना मंत्री आदित्य ठाकरे यांना सुरक्षा यंत्रणाकडून अडवण्यात आले त्यावरून आता संजय राऊत आक्रमक झाले आहेत. ज्या सुरक्षा यंत्रणांनी आदित्य ठाकरे यांना थांबवलं त्या सुरक्षा यंत्रणा आज चीनच्या बॉर्डरला पाठवायला पाहिजेत. आदित्य ठाकरे या राज्यचे राजशिष्टाचार मंत्री आहेत. मुख्यमंत्री यांचेनंतर अशा प्रकारच्या व्यक्तींकडून पंतप्रधानांचे स्वागत केले जाते, तसेच मुंबईत येऊन तुम्हाला जर ठाकरे माहीत नसतील तर हे अवघड आहे. हे जाणून बुजून केला जात आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.