AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut ED Raid : बाळासाहेबांची शपथ घेणं चूकीचं, राऊतांनी शरद पवारांची शपथ घ्यायला हवी होती; रामदास कदमांनी डिवचले

राज्यात महाविकास आघाडीचा उदय होण्यास सर्वाधिक जाबाबदार हे संजय राऊत राहिले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी आणि विशेषत: शरद पवार यांच्याबरोबर युती करण्यात जास्त रुची होती. मी मात्र, याला कायम विरोध केला होता, कायम भाजप सोबत युती करावी अशी भूमिका घेतल्याचे रामदास कदमांनी सांगितले आहे. युती केली मात्र, ज्यावेळी निधीवाटपात शिवसेनेच्या आमदारांवर अन्याय होत होता त्यावेळी का यांनी आपला स्पष्टोक्तेपणा दाखवला नाही.

Sanjay Raut ED Raid : बाळासाहेबांची शपथ घेणं चूकीचं, राऊतांनी शरद पवारांची शपथ घ्यायला हवी होती; रामदास कदमांनी डिवचले
रामदास कदमImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 31, 2022 | 10:46 AM
Share

मुंबई : संजय राऊतांच्या घरी ईडीचे अधिकारी अन् बाहेर विरोधकांकडून सडकून टिका असेच चित्र निर्माण झाले आहे. जर पत्राचाळ प्रकरणात त्यांनी चुकीचे काही केले नसेल तर भिण्याचे काय कारण असं म्हणत जो तो त्यांच्या बोचरी टिका करीत आहे. संजय शिरसाट यांनी त्यांना सुनावल्यानंतर आता रामदास कदमांनीही डिवचले आहे. संजय राऊत हे स्पष्टोक्ते आहेत, माझे चांगले मित्रही आहेत पण त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शपथ न घेता शरद पवारांची शपथ घ्यायला पाहिजे होती असा टोला कदमांनी लगावला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर शरद पवार यांचाच अधिक प्रभाव आहे. त्यामुळे त्यांनी जर शरद पवारांची शपथ घेतली असती तर अनेकांना त्यांचे म्हणणे खरे वाटले असते असेच कदमांना यातून सूचित करायचे होते. एकीकडे गेल्या 3 तासांपासून राऊतांची चौकशी सुरु आहे तर दुसरीकडे विरोधकांकडून आरोपही सुरु आहेत.

संजय राऊतांमुळे महाविकास आघाडी

राज्यात महाविकास आघाडीचा उदय होण्यास सर्वाधिक जाबाबदार हे संजय राऊत राहिले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी आणि विशेषत: शरद पवार यांच्याबरोबर युती करण्यात जास्त रुची होती. मी मात्र, याला कायम विरोध केला होता, कायम भाजप सोबत युती करावी अशी भूमिका घेतल्याचे रामदास कदमांनी सांगितले आहे. युती केली मात्र, ज्यावेळी निधीवाटपात शिवसेनेच्या आमदारांवर अन्याय होत होता त्यावेळी का यांनी आपला स्पष्टोक्तेपणा दाखवला नाही. त्यांनी आपला स्वार्थ साधला आणि आमदारांना वाऱ्यावर सोडले. उध्दव ठाकरे यांच्या आजारपणाचा फायदा घेतल त्यांनी ही सर्व जुळवाजुळव केल्याने महाविकास आघाडी अस्तित्वात आल्याचे कदमांनी सांगितले आहे.

शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही आमदारांवर अन्याय

पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री असतानाही सर्वात कमी निधी हा सेनेच्या आमदारांनाच होता. जर शिवसेनेबद्दल एवढे प्रेम होते तर आमदारांवर अन्याय होताना त्यांनी आपली रोखठोक भूमिका का मांडली नाही. ते शिवसेनेचे नेते असले तरी त्यांनी कायम राष्ट्रवादीचे हित जोपासण्याचा प्रयत्न केल्याचा घणाघात रामदास कदम यांनी केला आहे. सर्वाधिक निधी राष्ट्रवादीच्या आमदारांना त्यानंतर कॉंग्रेसच्या आणि मुख्यमंत्री सेनेचा असताना केवळ 17 टक्के निधी या आमदारांना हा कोणता न्याय असा सवाल त्यांनी नेतृत्वाला आणि राऊतांनाही विचारला आहे.

शिवसेनाही राऊतांनीच संपवली

गेल्या अडीच वर्षात पक्ष वाढीसाठी तर काही नाही पण पक्ष फोडण्यामध्ये राऊतांचा मोठा रोल असल्याचा आरोप कदमांनी केला आहे. राष्ट्रवादीचे संबंध जोपासण्यासाठी एवढा सर्व खटाटोप केला आणि दुसरीकडे ज्ञान पाजळत शिवसैनिकांना दूर केले. तुमच्यामुळेच शिवसेना फुटली आणि आज ही वेळ पक्षावर आली आहे. शिवाय नेतृत्वानेही त्यांचचे ऐकल्याने सध्या पक्षाची ही अवस्था झाल्याचे रामदास कदम यांनी सांगितले आहे.शरद पवरांना सांगून थोडीतरी शिवसेना शिल्लक ठेवा असे सांगितले असते पक्ष जीवंत राहिला असता असा टोलाही त्यांनी राऊतांना लगावला आहे.

मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.