Sanjay Raut | महाराष्ट्रात फडणवीसांचं राज्य आहे की निजामशाही ? लाज वाटत नाही ? संजय राऊत संतापले

राज्यामध्ये मोगलाई चालू आहे का ? महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांचं राज्य आहे की अफजलखान, शाहिस्तेखानाचं राज्य आहे, का निजामशाही आली आहे ? असा खडा सवाल विचारत संजय राऊत यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर कडाडून टीका केली.

Sanjay Raut | महाराष्ट्रात फडणवीसांचं राज्य आहे की निजामशाही ? लाज वाटत नाही ? संजय राऊत संतापले
Follow us
| Updated on: Jan 25, 2024 | 10:53 AM

मुंबई | 25 जानेवारी 2024 : राज्यामध्ये मोगलाई चालू आहे का ? महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांचं राज्य आहे की अफजलखान, शाहिस्तेखानाचं राज्य आहे, का निजामशाही आली आहे ? असा संतप्त सवाल विचारत संजय राऊत यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार , माजी महापौर किशोरी पेडणकेर आणि रवींद्र वायकर यांना ईडीने समन्स पाठवलंय.

त्यातच आता ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांना मोठा धक्का बसला आहे. संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे. ईडीने कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी संदीप राऊत यांना चौकशीचं समन्स बजावलं आहे. याच पार्श्वभूमीवर आजच्या पत्रकार परिदेषत संजय राऊत यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. विरोधी पक्षातल्या नेत्यांना नोटीस देण्याचं भाजपाचं तंत्र आहे असाही आरोप त्यांनी केला.

आम्ही गुडघे टेकणार नाही

विरोधी पक्षातील लोकांना नोटीस देण्याचं भाजपाचं तंत्र आहे. संदीप राऊतांना दिलेल्या नोटीशीच कारण हास्यास्पद आहे. आम्ही गुडघे टेकणारे लोक नाही, दोन-पाच लाखांसाठी, व्यवहारासाठी तुम्ही आम्हाला नोटीशी पाठवता, तुम्ही काय चिंचोके खाता ? असा सवालही त्यांनी सरकारला विचारला. तुमच्या घरातले लोक लंडनमध्ये कितीतरी दिवस, महिने राहतात. त्यासाठी पैसे कुठून आले ? लंडनमधला व्हिला, प्रवास खर्च याचे प्रायोजक कोण आहेत ? असं आम्ही विचारी शकतो. पण आम्ही कुटुंबापर्यंत जात नाही. आमच्यावर बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण, शरद पवार, उद्धव ठाकरे यांचे संस्कार आहेत त्यामुळे आम्ही कुटुंबांपर्यंत जाणार नाही. आमच्यावर ते संस्कार नाहीत. तुमची लढाई आमच्याशी आहे ना तर आमच्याशी लढून दाखवा. हे नामर्द लोक आहेत. आमचं घर डरपोक लोकांचं घर नाही. शिवसेना आमच्या रक्तात आहे असं संजय राऊत म्हणाले.

या लोकांना लाज वाटली पाहिजे

या लोकांनी रोहित पवार यांना नोटी बजावली. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना नोटीस बजावता. जे डरपोक होते ते तुमच्या कळपात शिरले. या लोकांना लाज वाटली पाहिजे, असे टीकास्त्र त्यांनी सोडलं. आयएनएस विक्रांतच्या नावाखाली पोपटलालने ( किरीट सोमय्या) 38 कोटी गोळा केला. त्याची तक्रार कुठे गेली, ती विरून गेली असा आरोपही त्यांनी केला.

अजित पवारांचा घोटाळा बाहेर काढून सरकारच्या जेलमध्ये टाकलं, राऊतांचा टोला

अजित पवारांचा घोटाळा बाहेर काढून पंतप्रधान मोदींनी त्यांना सरकारच्या जेलमध्ये टाकलं असं म्हणत संजय राऊत यांनी अजित पवारांसह भाजपाला उपरोधिक टोला लगावला. अजित पवारांना तुरुंगात टाकलं ना. त्यांना उपमुख्यमंत्रीपद देऊन मांडीवर घेतलं. या मांडीवर अजित पवार, दुसऱ्या मांडीवर हसन मुश्रीफ आणि खांद्यावर प्रफुल्ल पटेलांना बसवलं आहे. रामच तुमचा वध करणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला. हे लोक सांगतात की आम्ही रामाचे भक्त आहोत, रामाची पूजा करतो. रामच यांचा वध करणार आहे असंही ते म्हणाले.

 

Non Stop LIVE Update
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात.
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?.
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं.
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले.
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.