मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) हे सध्या अर्थ रोड कारागृहात आहेत. पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांना ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने अटक केली आहे. संजय राऊत यांना जामीन मिळावा यासाठी त्यांचे बंधू सुनील राऊत(Sunil Raut) हे धावाधाव करत आहेत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray)यांची मातोश्री येथे भेट घेतल्यानंतर सुनील राऊत यांनी आता थेट दिल्ली गाठली आहे. संजय राऊत प्रकरणाबाबत वरिष्ठ वकिलांशी चर्चा करण्यासाठी सुनील राऊत दिल्लीत पोहोचले आहेत.