सोलापुरात राडा, संजय शिंदेंच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेनेचे बंडखोर उमेदवाराच्या कार्यकर्त्याला मारहाण

| Updated on: Oct 21, 2019 | 11:57 AM

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदान सुरळीत पार पडत असताना करमाळ्यात मात्र मतदानाला गालबोट लागलं आहे. करमाळ्यातील शिवसेनेचे बंडखोर उमेदवार नारायण पाटील यांच्या कार्यकर्त्याला जबर मारहाण करण्यात (Maharashtra Vidhansabha Election Voting) आली आहे.

सोलापुरात राडा, संजय शिंदेंच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेनेचे बंडखोर उमेदवाराच्या कार्यकर्त्याला मारहाण
Follow us on

सोलापूर : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदान सुरळीत पार पडत असताना करमाळ्यात मात्र मतदानाला गालबोट लागलं आहे. करमाळ्यातील शिवसेनेचे बंडखोर उमेदवार नारायण पाटील यांच्या कार्यकर्त्याला जबर मारहाण करण्यात (Maharashtra Vidhansabha Election Voting) आली आहे. अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांनी ही मारहाण केल्याचा आरोप नारायण पाटील यांनी केला आहे.

शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार नारायण पाटील यांच्या काही कार्यकर्त्याला जबर मारहाण झाली आहे. या मारहाणीत नारायण पाटील यांचे कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. पाटील यांच्या कार्यकर्त्यांना डोक्याला मारहाण झाल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केल्याचा आरोप नारायण पाटील यांनी केला (Maharashtra Vidhansabha Election Voting)  आहे.

तर दुसरीकडे अमरावतीमधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार देवेंद्र भुयार यांची गाडी जाळण्याचा प्रकार समोर आला. अमरावतीतील वरुड मतदारसंघात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे अमरावतीमध्ये काही काळ तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhansabha Election Voting) सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. अनेक दिग्गजांनी सकाळी सातच्या (Voting percentage in maharashtra 2019) ठोक्याला मतदानाचा (Maharashtra Vidhansabha Election Voting)  हक्क बजावला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Vidhansabha Election Voting) राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये आज एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. येत्या 24 तारखेला (गुरुवार 24 ऑक्टोबर 2019) निवडणुकांचे निकाल हाती येतील. 3 हजार 237 उमेदवार रिंगणात आहेत.