Sanjay Shirsat : मुंबईला रात्रं कुठे घालवता याची कल्पना सर्वांना आहे, संजय शिरसाठ यांना सामान्य शिवसैनिकाचे खरमरीत पत्र

| Updated on: Jun 23, 2022 | 3:26 PM

आमचे वडील सांगतात आपण सक्रिय राजकारणात येण्याआधी रिक्षा चालक होता आणि आपणही हे अनेक वेळा जाहीररित्या बोलून दाखवले आहे. संभाजीनगर स्थानिक शिवसेना नेत्यांवर विश्वास ठेऊन आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला पक्षाच्या, लोकप्रतिनिधी पदाच्या अनेक जबाबदाऱ्या दिल्या.

Sanjay Shirsat : मुंबईला रात्रं कुठे घालवता याची कल्पना सर्वांना आहे, संजय शिरसाठ यांना सामान्य शिवसैनिकाचे खरमरीत पत्र
Image Credit source: facebook
Follow us on

मुंबई – विधान परिषदेचा निकाल जाहीर झाला आणि महाविकास आघाडी (MVA) सरकारला उतरती कळा लागली असं म्हणायला हरकत नाही. शिवसेनेचे मोठे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अनेक आमदारांसोबत बंड पुकारलं आहे. मागच्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण राज्याच्या बाहेर गेलं आहे. म्हणजे गुजरात आणि गुवाहाटीच्या पंचातारांकित हॉटेलमधून राजकीय डावपेच आखत असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे अनेक आमदार फुटल्यामुळे पक्षात अव्यस्थता आहे. मागच्या तीन दिवसांपासून बंड केलेल्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांसह इतर नेत्यांवरती अनेक आरोप केले आहेत. संजय शिरसाठ यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानंतर आता एक सामान्य शिवसैनिकाने संजय शिरसाठ (Sanjay Shirsat) खरमरीत पत्रातून उत्तर दिलं आहे. सध्या हे पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं असून त्याची चर्चा देखील केली जात आहे. काल मुख्यमंत्र्यांनी वर्षा हे निवासस्थान सोडल्यानंतर शिवसैनिक भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले होते.

हे सगळं फक्त शिवसेना आणि ठाकरे कुटुंबियांच्या प्रेमाखातर

आमचे वडील सांगतात आपण सक्रिय राजकारणात येण्याआधी रिक्षा चालक होता आणि आपणही हे अनेक वेळा जाहीररित्या बोलून दाखवले आहे. संभाजीनगर स्थानिक शिवसेना नेत्यांवर विश्वास ठेऊन आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला पक्षाच्या, लोकप्रतिनिधी पदाच्या अनेक जबाबदाऱ्या दिल्या. आपण सर्वसाधारण रिक्षावालापासून 3 वेळेस आमदार झालात. शिरसाटजी हेच नाही तर आपण आपल्या मुलालाही आमची इच्छा नसताना आमच्यावर लादले. त्याचा भयानक त्रास सहन करूनही आम्ही मेहेनत करून जनतेच्या साथीने त्यालाही लायकी नसताना निवडणूक दिले. हे सगळं फक्त शिवसेना आणि ठाकरे कुटुंबियांच्या प्रेमाखातर…

संजय शिरसाट म्हणजे आमच्यासाठी फक्त शिवसेनेने दाखवलेला दगड..

संजय शिरसाट म्हणजे आमच्यासाठी फक्त शिवसेनेने दाखवलेला दगड…याचा प्रत्यय तुम्हाला 2019 सालच्या निवडणुकीत आला आहे. संजय शिरसाट या नावाला जनतेचा प्रचंड विरोध होता. जनतेचाच काय तुमच्या जिवाभावाच्या सहकाऱ्यांनी सुद्धा आपली साथ सोडली होती. त्यासाठी पण अनेक कारणं होती. जेव्हा तुमच्या विरोधात सगळे उभे होते आता तुम्ही ज्यांच्या सोबत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सोबत जाणार आहात. त्या भाजपने राजू शिंदे नावाचा भाजपचा माजी उपमहापौर आपल्या विरोधात उभा केला. देवेंद्र फडणवीस स्वतः राजू शिंदेच्या संपर्कात होते. पैशांचा मोठा बाजार झाला अनेक दिग्गज मंडळीनी आपल्याला पाडण्यासाठी कंबर कसली होती. तुमच्याच जवळच्या सहकाऱ्यांनी सांगितले की आपणही निवडणूक काळात अनेक वेळा “रात्रीच्या” वेळी रडलात, हतबल झालात!

हे सुद्धा वाचा

आम्ही शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीय यांच्या सोबत आहोत

अगदी निकालाच्या आदल्या दिवशी सुद्धा तुम्ही विजयाची आशा सोडली होती. पण निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी झालेला चमत्कार आपल्यासाठी सुद्धा आश्चर्यकारक होता याचे आम्ही सगळे शिवसैनिक साक्षीदार आहोत. तो सर्व चमत्कार फक्त आणि फक्त आपल्याला शिवसेनेचा दगड समजून केलेल्या शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांनी दाखवलेल्या विश्वासामुळे.शिवाजीनगर, पदमपुरा अशा अनेक भागातून आपल्याला लीड मिळालेली मत ही शिवसेनेची होती; संजय शिरसाटची नाही, हे संभाजीनगर पश्चिममधील प्रत्येक मतदार, शिवसैनिक सांगू शकतो. असो बोलण्यासारखं खूप काही आहे. तुम्ही उद्धवसाहेब भेटत नाही म्हणता. काल त्यांनी, ते का भेटत नव्हते हे सांगितले. तुम्ही मतदारांना न भेटता अनेक “रात्री” मुंबईला कुठे घालवता याची कल्पना सर्वांना आहे. आपले अनेक कारनामे शिवसैनिकांनी पाठीशी घातले फक्त आणि फक्त शिवसेनेच्या आपुलकी पोटी. आमच्या जीवावर तुम्ही निवडून आलात. तर अमाच्याही भावना ऐकून घ्या. आम्ही शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीय यांच्या सोबत आहोत आणि सदैव राहणार अजून जे काही मनात आहे ते येणाऱ्या निवडणुकीत बोलू असं खरमरीत उत्तर एका सामान्य नागरिकाने दिले आहे.