
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत अत्यंत रंगतदार लढत रंगण्याची चिन्हे आहेत. एकीकडे शिवसेना शिंदे गटातील नेते आणि मंत्री दीपक केसरकर हे चौथ्यांदा विजयी षटकार ठोकण्याच्या उद्देशाने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र यावेळी त्यांच्यासमोर काही आव्हानं आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांविरोधात महायुती आणि मविआमधून एकेका इच्छुक उमेदवाराने बंडखोरी केल्याने इथली समीकरणं आता बदलली आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत सावंतवाडीमध्ये महायुतीकडून शिंदे गटाचे दीपिक केसरकर यांच्याविरुद्ध ठाकरे गटाचे राजन तेली अशी मुख्य लढत होती. पण इच्छुक उमेदवारांच्या बंडखोरीमुळे या मतदारसंघात चौरंगी लढत पहायला मिळणार आहे. महायुतीमधील भाजपाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले नेते विशाल परब आणि मविआमधील शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या अर्चना घारे परब या दोघांच्या बंडखोरीमुळे सावंतवाडीतील निवडणूक आता चौरंगी झाली आहे. मतदारसंघाचा इतिहास सावंतवाडी या मतदारसंघाचा राजकीय इतिहास फार रंजक आहे. 1962 ते 2009 पर्यंत इथे भारतीय...