SEBC Category : एसईबीसी प्रवर्गातील नियुक्त्यांबाबत महाविकास आघाडी सरकारचा महत्वाचा निर्णय

9 सप्टेंबर 2020 पूर्वीच्या एसईबीसीच्या नियुक्त्या कायम राहणार आहेत. मात्र, स्थगितीनंतर एसईबीसीचा कोणताही लाभ घेता येणार नाही. सगळ्या एईबीसीच्या पदांना ईडब्ल्यूएस किंवा खुल्या प्रवर्गाचा पर्याय असणार आहे.

SEBC Category :  एसईबीसी प्रवर्गातील नियुक्त्यांबाबत महाविकास आघाडी सरकारचा महत्वाचा निर्णय
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मंबई : राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं रखडलेल्या नियुक्तांबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. 9 सप्टेंबर 2020 पूर्वीच्या एसईबीसीच्या नियुक्त्या कायम राहणार आहेत. मात्र, स्थगितीनंतर एसईबीसीचा कोणताही लाभ घेता येणार नाही. सगळ्या एईबीसीच्या पदांना ईडब्ल्यूएस किंवा खुल्या प्रवर्गाचा पर्याय असणार आहे. खुल्या प्रवर्गात वर्ग करुन लवकरात लवकर नियुक्त्या देण्याचे आदेश राज्य सरकारने सर्व विभागांना दिले आहेत. (SEBC appointments prior to 9 September 2020 will be maintained)

SEBCच्या सर्व जागा आता खुल्या प्रवर्गातून भरल्या जाणार

MPSCने SEBCच्या विद्यार्थ्यांनी एक सुधारित परिपत्रक काढलं आहे. त्यानुसार आता MPSCतील SEBC प्रवर्गाच्या जागा खुल्या प्रवर्गातून भरल्या जाणार आहेत. SEBCच्या जागा खुल्या प्रवर्गात रुपांतरित करुनच आयोग निकाल लावणार आहे. SEBCच्या जागा खुल्या गटात वर्ग करुन आरक्षणानुसार पदसंख्या निश्चित करण्यात आल्याची माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे.

कोणत्या परीक्षांमध्ये SEBCच्या जागा खुल्या प्रवर्गातून भरल्या जाणार?

एमपीएससी गट ब पुर्व परीक्षा 2020 सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पुर्व परीक्षा 2020 महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पुर्व परीक्षा 2020 संयुक्त गट ब अराजपत्रित 2020

15, 511 पदांची भरती लवकरच

राज्याचे माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नोकर भरतीबाबतची मोठी घोषणा केली आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आदी विभागांना पदभरतीच्या निर्बंधामधून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे गट अ ते क पर्यंतची एकूण 15 हजार 511 पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणाच दत्तात्रय भरणे यांनी केली आहे.

‘एमपीएससी’मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा आणि रिक्‍त पदांच्या भरतीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग इत्यादी विभागांना पदभरतीच्या निर्बंधामधून सूट देण्यात आली आहे. तसेच गट अ ची 4 हजरा 417 पदे, गट ब ची 8 हजार 31 पदे आणि गट कची 3 हजार 63 पदे अशी एकूण 15 हजार 511 पदे भरण्यास वित्त विभागाने सन 2018 पासून मान्यता दिलेली आहे. त्याअनुषंगाने या पदांचे आरक्षण तपासून पद भरती गतीने राबवण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे, असं भरणे यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

Maharashtra SSC Result 2021: दहावीच्या निकालाची तारीख जाहीर, उद्या दुपारी निकाल!

Maharashtra cabinet decision : सार्वजनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोग, वैद्यकीय अधिकाऱ्यांचं निवृत्तीचं वय वाढवलं, ठाकरे कॅबिनेटचे मोठे निर्णय

SEBC appointments prior to 9 September 2020 will be maintained

Published On - 3:20 pm, Thu, 15 July 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI