राहुल गांधींचं नेतृत्त्व पवारांनीही स्वीकारलं

| Updated on: Jul 05, 2019 | 4:47 PM

सातारा : 1999 साली गांधी कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप करुन बाहेर पडलेल्या शरद पवारांनी आता गांधी कुटुंबावर स्तुतीसुमनं उधाळली आहेत. सोनिया आणि राहुल गांधी हेच देशाला चांगलं नेतृत्त्व देऊ शकतात, असं जाहीर वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. सातारा जिल्ह्यातील पाटणमध्ये ते बोलत होते. शरद पवार देशाचे पंतप्रधान होऊ शकतात, अशी अपेक्षा राष्ट्रवादी […]

राहुल गांधींचं नेतृत्त्व पवारांनीही स्वीकारलं
Follow us on

सातारा : 1999 साली गांधी कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप करुन बाहेर पडलेल्या शरद पवारांनी आता गांधी कुटुंबावर स्तुतीसुमनं उधाळली आहेत. सोनिया आणि राहुल गांधी हेच देशाला चांगलं नेतृत्त्व देऊ शकतात, असं जाहीर वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. सातारा जिल्ह्यातील पाटणमध्ये ते बोलत होते.

शरद पवार देशाचे पंतप्रधान होऊ शकतात, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व्यक्त करत असतानाच, दुसरीकडे पवारांनी मात्र गांधी कुटुंबाचं नेतृत्त्व स्वीकारलं आहे. यापूर्वीही डीएमकेचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी राहुल गांधींचं नेतृत्त्व स्वीकारलं होतं.

“राज्यपातळीवर आघाडी करावी याची जबाबदारी माझ्यावर आहे. प्रत्येक राज्यात भाजपविरोधी जो मोठा पक्ष आहे, त्यांना पुढे घेऊन अन्य पक्षांनी त्यांच्या पाठिशी रहावे. तामिळनाडूत डीएमके आहे, पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेस आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादी-काँग्रेस आहे. अशा पक्षांनी पुढाकार घ्यावा,” असं आवाहन पवारांनी केलं.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रत्येक राज्यात प्रादेशिक पक्षांची मोट बांधणं सुरु आहे. पवारांचं नावही पंतप्रधानपदासाठी पुढे केलं जातं, पण पवारांनी स्वतःच राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे नेतृत्त्व देऊ शकत असल्याचं म्हटलं आहे.

महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जागावाटपाचा तिढा जवळपास सोडवल्यात जमा आहे. 48 लोकसभा मतदारसंघांपैकी 40 जागांचा तिढा सुटल्याचं बोललं जात आहे. उर्वरित जागांवरही लवकरच तोडगा काढला जाणार आहे.