AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नगरची जागा राष्ट्रवादीकडेच, सुजय विखेंचं आघाडीत योगदान काय? : शरद पवार

अहमदनगर :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत:ची उमेदवारी मागे घेतली. पवारांनी माढ्यातून लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. मात्र कौटुंबिक कारण देत, पवारांनी निवडणूक न लढण्याचं जाहीर केलं. दुसरीकडे पवारांनी नातू पार्थ पवार यांच्यासाठी मावळ मतदारसंघात आग्रह होत असल्याने, त्यांना तिथून उमेदवारी देण्याची अप्रत्यक्ष घोषणा यावेळी पवारांनी केली. शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार […]

नगरची जागा राष्ट्रवादीकडेच, सुजय विखेंचं आघाडीत योगदान काय? : शरद पवार
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM
Share

अहमदनगर :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत:ची उमेदवारी मागे घेतली. पवारांनी माढ्यातून लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. मात्र कौटुंबिक कारण देत, पवारांनी निवडणूक न लढण्याचं जाहीर केलं. दुसरीकडे पवारांनी नातू पार्थ पवार यांच्यासाठी मावळ मतदारसंघात आग्रह होत असल्याने, त्यांना तिथून उमेदवारी देण्याची अप्रत्यक्ष घोषणा यावेळी पवारांनी केली.

शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. यावेळी शरद पवारांनी अहमदनगरच्या जागेबाबतही भाष्य केलं. नगरची जागा ही राष्ट्रवादीच लढवणार असल्याचं पवार म्हणाले.

शिवाय काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांच्या भाजपमध्ये जाण्याने आघाडीला फरक पडणार नाही. त्यांचं आघाडीसाठी काहीही योगदान नाही, असं पवारांनी नमूद केलं.

नगरची जागा राष्ट्रवादीकडेच असेल. आमचे तिथं प्राबल्य आहे. तिथं आम्ही बाळासाहेब विखे यांचा पराभव केला होता, हे प्रकरण न्यायालयात गेले होते. अहमदनगर दक्षिण राष्ट्रवादीकडंच राहिल, असं पवारांनी सांगितलं.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे या काँग्रेसमध्येच आहेत. त्यामुळे सुजय भाजपात गेल्यानं आघाडीवर परिणाम होणार नाही, असं पवार म्हणाले.

नगर दक्षिणमध्ये राष्ट्रवादीकडून प्रशांत गडाख?

दरम्यान, नगर दक्षिणेत राष्ट्रवादीकडून प्रशांत गडाख यांच्या नावाची चर्चा आहे. शरद पवारांनी गडाख अस्त्र बाहेर काढल्याची चर्चा आहे. जर प्रशांत गडाख यांना उमेदवारी मिळाली, तर विखे विरुद्ध गडाख लढाईची पुनरावृत्ती पाहायला मिळू शकते. कारण यशवंतराव गडाखांनी स्वर्गीय बाळासाहेब विखेंचा पराभव केला होता. 1991- च्या लोकसभा निवडणुकीत विखे गडाख खटला देशभरात गाजला होता.  हा वाद प्रत्येक राजकारणात पाहायला मिळाला. त्यानंतर शरद पवार आणि विखे पाटील घराण्यात हा वाद आला. जर सुजय विखेंनी इथे लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आणि राष्ट्रवादीने प्रशांत गडाख यांना उमेदवारी दिली तर हा वाद आणखी ताणणार यात शंका नाही.

Follow Us
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप