शरद पवारांना पहिली अटक कधी झाली होती?

| Updated on: Sep 25, 2019 | 4:24 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे . राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणात शरद पवार, अजित पवार यांच्यासह 70 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.

शरद पवारांना पहिली अटक कधी झाली होती?
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे . राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणात शरद पवार, अजित पवार यांच्यासह 70 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. एखाद्या एफआयआरमध्ये नाव असण्याची ही आपली दुसरी वेळ आहे, असं शरद पवारांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं.

शरद पवारांना पहिली अटक कधी?

शरद पवारांनी आपल्याला पहिली अटक कधी झाली होती याची माहिती आजच्या पत्रकार परिषदेत दिली. पवार म्हणाले, “1980 मध्ये जेव्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जळगाव ते मुंबई असा मोर्चा काढला होता, तेव्हा आम्हाला अटक झाली होती. त्यानंतर माझ्यावर गुन्हा दाखल झाला होता. आता हे दुसरे प्रकरण आहे”

शरद पवारांवर गुन्हा

दरम्यान, राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (money laundering sharad pawar) यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल झालाय. त्यांच्यासोबत पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (money laundering ajit pawar) यांच्यावरही गुन्हा दाखल झालाय. अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने मनी लाँडरिंग अर्थात पैशाची अफरातफर/आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. ईडीने गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये अजित पवार यांच्यासह 70 माजी संचालकांचा समावेश आहे.

पवारांची पत्रकार परिषद

शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. पवार म्हणाले, काल संध्याकाळपासून माहिती मिळत आहे की शिखर बँकेच्या तथाकथित भ्रष्टाचारा प्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे.   मी तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करणार आहे. मला निवडणूक प्रचारासाठी वेळही द्यावा लागणार आहे. प्रचारासाठी मला मुंबईच्या बाहेर राहावे लागेल. ईडीला मला प्रेमाचा संदेश पाठवायचा असेल, त्यामुळे ईडीला असं वाटयाला नको की मी अदृश्य ठिकाणी आहे. त्यामुळे शुक्रवारी 27 रोजी 2 वाजता मी स्वतः ईडीच्या ऑफिसला जाणार आहे. ईडीला हवी असलेली माहिती देईन आणि अन्य पाहुणाचासाठी ही माझी तयारी आहे”.

मी महात्मा फुले, शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अस्था ठेवणारा व्यक्ती आहे. संविधानबाबत मला आदर आहे. त्यामुळे मी सहकार्य करणार. पण एक सांगतो हा महाराष्ट्र शिवबांचा महाराष्ट्र आहे. दिल्लीच्या तख्तावर झुकणे महाराष्ट्राने शिकवले नाही, असं पवारांनी नमूद केलं.