आधी तटकरेंच्या उपस्थितीत शरद पवार-अमित शाहांची बैठक, मग तटकरेंशिवाय वेगळी चर्चा!

| Updated on: Aug 03, 2021 | 3:25 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि देशाचे नवे सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. राजधानी दिल्लीत दोघांची भेट झाली.

आधी तटकरेंच्या उपस्थितीत शरद पवार-अमित शाहांची बैठक, मग तटकरेंशिवाय वेगळी चर्चा!
Amit Shah Sharad Pawar
Follow us on

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि देशाचे नवे सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. राजधानी दिल्लीत दोघांची भेट झाली. यावेळी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेही बैठकीला उपस्थित होते. जवळपास अर्धा ही बैठक झाली. महत्त्वाचं म्हणजे शरद पवार आणि अमित शाह या दोघांची वेगळी 15 मिनिटे बैठक झाली. या वेगळ्या बैठकीत ‘वेगळ्या’ विषयावर खलबतं झाल्याचं सांगण्यात येत आहे.

शरद पवार यांनी दुपारी 2 च्या सुमारास संसदेत अमित शाहांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. अमित शाहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची ही पहिलीच भेट आहे.

महत्त्वाचं म्हणजे 15 दिवसांपूर्वी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्यानंतर आज ते अमित शाहांची भेट घेतली. अमित शाह हे देशाचे नवे सहकारमंत्री आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सहकाराच्या मुद्द्यांवर शरद पवारांनी नव्या केंद्रीय सहकार मंत्र्यांशी चर्चा केली.

शरद पवार नरेंद्र मोदी भेट 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात 17 जुलैला पंतप्रधान कार्यालयात भेट झाली होती. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली होती. लोकसभेचं पावसाळी अधिवेशन आणि नव्या सहकार खात्याची निर्मिती या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली होती.

शरद पवार-नितीन गडकरी भेट

दरम्यान, शरद पवारांनी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. गेल्याच आठवड्यात नितीन गडकरी आणि शरद पवार यांचीही भेट झाली होती. नितीन गडकरी यांनी शरद पवारांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती.

शरद पवारांच्या दिल्लीतील भेटीगाठी

शरद पवारांनी गेल्या काही दिवसात, अल्पकाळात अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. शरद पवार हे 17 जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना भेटले होते.  त्यानंतर वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी शरद पवारांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.

शरद पवार दिल्लीत कोणाकोणाला भेटले? 

  • संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह
  • वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी
  • गृह आणि सहकार मंत्री अमित शाह

 VIDEO: शरद पवार आज अमित शाहांना भेटणार

संबंधित बातम्या  

शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले, दोन्ही नेत्यांमध्ये तासभर खलबतं

“पूर्वी शरद पवार नरेंद्र मोदींना भेटले, महाराष्ट्रात 80 तासांचं सरकार बनलं, आता काय होईल?”