Girish Bapat | संध्याकाळी 7 वाजता गिरीश बापट यांच्यावर अंत्यसंस्कार, हे मोठे नेते उपस्थित राहणार

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर सर्वच पक्षाचे नेते त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. त्यांच्या अंत्यदर्शनाला विविध पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत.

Girish Bapat | संध्याकाळी 7 वाजता गिरीश बापट यांच्यावर अंत्यसंस्कार, हे मोठे नेते उपस्थित राहणार
| Updated on: Mar 29, 2023 | 4:40 PM

पुणे : भाजपचे दिग्गज नेते आणि खासदार गिरीश बापट यांचं वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झालं. गिरीश बापट ( GIrish Bapat ) यांचं पार्थिव संध्याकाळी ६ वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर ७ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. अंत्यसंस्काराला अनेक मोठे नेते उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत. यासोबतच भाजपसह इतर पक्षाचे नेते देखील अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात दाखल झाले आहेत. गिरीश बापट यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेणार आहेत. गिरीश बापट यांच्या जाण्यानं एक चटका लावून गेलाय, एक प्रामाणिक, दिलदार आणि निष्ठावान नेता होते, गिरीश बापट माझे जवळचे मित्र होते, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांचे जवळचे मानले जाणारे मिलिंद नार्वेकर यांनी देखील गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ते देखील पुण्यात अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

आरोग्य मंत्री तानाजी सावंत, मनसे नेते वसंत मोरे हे देखील गिरीश बापट यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले आहेत. खासदार श्रीनिवास पाटील गिरीष बापट यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले आहेत. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गिरीश बापट यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. त्याआधी पुणे पोलिसांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली.

 

’40 वर्षांहून अधिक काळ सामाजिक जीवनात सक्रीय असताना आपल्या पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहून पक्षाच्या पलीकडे ही मैत्रीचा जिव्हाळा आणि माणुसकीचं नातं जपणार नेतृत्व आज आपल्यातून हरपलं.’ अशा शब्दात शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी खासदार गिरीश बापट यांना श्रद्धांजली व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील खासदार गिरीश बापट यांना ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील गिरीश बापट यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील ट्विट करत गिरीश बापट यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.