‘अनिल देशमुखांनी राष्ट्रवादीची जबाबदारी समर्थपणे सांभाळली’, पवारांकडून कौतुक; भाजपवर जोरदार हल्लाबोल

| Updated on: Nov 17, 2021 | 11:19 PM

अस्थिरता निर्माण करायला अखंड प्रयत्न केलाय. वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून छळवाद सुरु केल्याचा आरोप पवारांनी केलाय. मुंबईचे पोलीस आयुक्त माझ्याकडे आले आणि त्यांनी अनिल बाबूंबद्दल ही तक्रार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. अनिल देशमुख याचा दोष काय? हे मला समजत नाही. शहानिशा होईपर्यंत मी सत्तेत राहत नाही, असं मला देशमुख यांनी सांगितलं आणि स्वाभिमानाने त्यांनी राजीनामा दिला, असंही पवारांनी सांगितलं.

अनिल देशमुखांनी राष्ट्रवादीची जबाबदारी समर्थपणे सांभाळली, पवारांकडून कौतुक; भाजपवर जोरदार हल्लाबोल
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. तसंच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं कौतुक करत, देशमुखांनी राष्ट्रवादीची जबाबदारी समर्थपणे सांभाळली असं म्हटलं. त्यामुळे शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस खंबीरपणे पाठीशी उभं असल्याचं पाहायला मिळत आहे. (Sharad Pawar praises Anil Deshmukh, while criticizes BJP over raids by investigative agencies)

गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदा असं झालं आहे की मी नागपुरात आलो आणि माझ्यासोबत अनिल देशमुख नाहीत. अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादीची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. केंद्रातील सत्तेचा गैरवापर करुन राज्यातील सत्ता अस्थिर करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरु आहे. या सरकारमध्ये राष्ट्रवादी महत्वाचा भाग आहे. काही लोकांना सत्ता हातातून गेल्याने अस्वस्थता आलीय. अस्थिरता निर्माण करायला अखंड प्रयत्न केलाय. वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून छळवाद सुरु केल्याचा आरोप पवारांनी केलाय. मुंबईचे पोलीस आयुक्त माझ्याकडे आले आणि त्यांनी अनिल बाबूंबद्दल ही तक्रार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. अनिल देशमुख याचा दोष काय? हे मला समजत नाही. शहानिशा होईपर्यंत मी सत्तेत राहत नाही, असं मला देशमुख यांनी सांगितलं आणि स्वाभिमानाने त्यांनी राजीनामा दिला, असंही पवारांनी सांगितलं.

तपास यंत्रणांच्या धाडीवरुन पवारांचा भाजपवर निशाणा

तसंच राज्य सरकारनं जाहीर केलंय की परमबीर सिंग भगोडा आहे. परमबीर यांनी केलेले आरोप खोटे आहेत. खोटे आरोप करणारा अधिकारी बाहेर आहे आणि अनिल देशमुख आत आहेत. सत्ता गेली म्हणून काही लोक अस्वस्थ आहेत. ते केंद्राकडे लिस्ट पाठवतात आणि त्याची चौकशी करायला सांगतात. संजय राऊत यांच्या पत्नीली ईडीची नोटीस बजावली. अजित पवार यांच्याबद्दल काही करता येत नाही. म्हणून राज्य सरकार अस्थिर करण्यासाठी त्यांच्या बहिणीच्या घरात धाडसत्र सुरु केलं. अजित पवार यांच्या घरी आयटीचे लोक पाच दिवस बसले. ते दिल्लीचे आदेश होते. हसन मुश्रीफ यांच्याबद्दल चौकशी करतात. महाराष्ट्र राज्य हातचं गेलं, ते परत मिळत नाही. म्हणून ईडीच्या माध्यमातून त्रास दिला जातो. तुम्ही कितीही त्रास द्या. सामान्य जनता तुम्हाला कहीही सत्तेत येऊ देणार नाही. जनता आज ना उद्या वसूल करेल, असा घणाघात पवारांनी केलाय.

‘राष्ट्रवादी व्याजासकट अद्दल घडवेल’

सत्ता आली तर पाय जमिनीवर ठेवायचे असतात. पाय जमिनीवर नसले, त्यांची सत्ता गेली तर ते अस्वस्थ होतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांना व्याजासकट अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाहीत. मिळालेली सत्ता सन्मानाने वापरायची हे त्यांना मान्य नाही. उत्तर प्रदेशात शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे, अशी टीकाही पवारांनी केलीय. त्याचबरोबर आगामी विधानसभा आणि महानगरपालिकेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवू, असा दावाही पवार यांनी केला आहे.

इतर बातम्या :

‘ऊन, वारा आणि आज तर पावसाला तोंड देत एसटी कर्मचारी आस लावून, त्यांच्याकडे लक्ष द्याल का?’

राज्यात कुठेही दंगल झाली तरी भाजपच्या माथी लावण्याचं ठाकरे सरकारचं काम, भाजपचा आरोप

Sharad Pawar praises Anil Deshmukh, while criticizes BJP over raids by investigative agencies