AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सचिन तेंडुलकरने मराठीच्या मुद्द्यावर का बोलावे? शरद पवार यांचा सवाल; मोर्चात सहभागी होण्याबाबत म्हणाले…

शरद पवार हिंदीविरोधातील आंदोलनात सहभागी होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच सचिन तेंडुलकरने हिंदीबाबत भाष्य करावं असं बोललं जात आहे. यावर शरद पवारांनी आपले मत व्यक्त केले आहे.

सचिन तेंडुलकरने मराठीच्या मुद्द्यावर का बोलावे? शरद पवार यांचा सवाल; मोर्चात सहभागी होण्याबाबत म्हणाले...
शरद पवार
| Edited By: बापू गायकवाड | Updated on: Jun 27, 2025 | 3:42 PM
Share

शालेय अभ्यासक्रमात हिंदी सक्ती विरोधात विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे 5 जुलै रोजी हिंदीविरोधात एकत्र आंदोलन करणार आहेत. त्यामुळे शरद पवार या आंदोलनात सहभागी होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही हिंदी सक्तीच्या मुद्यावर भाष्य करावं अशी मागणी होत आहे. आता शरद पवारांनी सर्व मुद्यांवर भाष्य केले आहे.

पाचवीपासून हिंदी योग्य – शरद पवार

कोल्हापुरात आज शरद पवारांची पत्रकार परिषद पार पडली, यावेळी त्यांना राज्यातील हिंदी सक्तीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, पहिली ते चौथीपर्यंत हिंदीची सक्ती करणं योग्य नाही, तसेच हिंदीला दुर्लक्षीत करूनही चालणार नाही. पाचवीपासून हिंदी योग्य आहे. पहिली ते चौथीपर्यंत एकदम नविन भाषा लादणं योग्य नाही.

सचिन तेंडुलकरने हिंदीबाबत का बोलावे ?

सचिन तेंडुलकरने हिंदी सक्तीबाबत बोलण्याबाबत प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी, ‘असा का हट्ट करायाचा? सचिन तेंडुलकरने का बोलावे ? तो ज्यात एक्स्पर्ट आहे त्यावर तो बोलेल. त्याला क्रिकेटबद्दल विचारावं.’ असं विधान केलं आहे.

आंदोलनात सहभागी होणार का?

हिंदी विरोधातील आंदोलनात सहभागी होणार का? याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, दोन्ही ठाकरेंची भूमिका वाचली, मी मुबंईला गेल्यावर याबाबत त्यांची भेट घेईल. त्यांनी मोर्चात सहभागी व्हा असं म्हटलं आहे, तुम्ही सहभागी व्हा म्हटल्यावर होता येतं असे नाही, भूमिका समजून घ्यावी लागेल. महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय असतील तर भूमिका घेतली जाईल. माझं म्हणणं आहे की 1 ते 4 हिंदी सक्ती नको.

शक्तिपीठ महामार्गाबाबत भूमिका समजून घेणार

शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘शक्तिपीठ संदर्भात याच्या आधी मी जाहीर केलं की याचे फायदे आणि शेतकरी भूमिका मला समजून घ्यायची आहे. कोणत्याही प्रकल्पाला विरोध होतो. मी हा प्रश्न कसा सोडवता येईल यासाठी प्रयत्न करतो. राजू शेट्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची भूमिका समजून घ्यायची आहे. सरकारची भूमिका देखील पाहिली पाहिजे.

राज्यात सध्या मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची चर्चा सुरु आहे. याबाबत प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले की, शिवसेना आणि मनसे एकत्र आले तर चांगले आहे. ते एकत्र येतील की नाही हे मला माहिती नाही. ते एकत्र येण्यासाठी संजय राऊत प्रयत्न करत आहेत.’

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी