‘सुप्रिया सुळे मुख्यमंत्री व्हाव्यात, या स्वप्नाच्या आशेने शरद पवारांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय ऐनवेळी बदलला’

| Updated on: Nov 25, 2020 | 6:39 PM

सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राच्या पहिला महिला मुख्यमंत्री करण्याचे शरद पवार यांचे स्वप्न आहे. | Sharad Pawar

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री व्हाव्यात, या स्वप्नाच्या आशेने शरद पवारांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय ऐनवेळी बदलला
Follow us on

मुंबई: गेल्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) भाजपला पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, ऐनवेळी शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपला निर्णय बदलून शिवसेना आणि काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचा दावा ‘पॉवर ट्रेडिंग’ या पुस्तकात करण्यात आला आहे. (Why Sharad Pawar change his decision of supporting BJP in 2019)

सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राच्या पहिला महिला मुख्यमंत्री करण्याचे शरद पवार यांचे स्वप्न आहे. राज्यातील महाविकासआघाडी सरकार टिकले तर आपले हे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे, याची जाणीव शरद पवार यांना झाली. त्यामुळेच शरद पवार यांनी ऐनवेळी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय बदलला, असे ‘पॉवर ट्रेडिंग’च्या लेखिका प्रियम गांधी यांनी सांगितले.

प्रियम गांधी यांनी बुधवारी ‘टीव्ही 9 मराठी’शी खास बातचीत केली. यावेळी त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले. गेल्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीला भाजपला पाठिंबा देण्याचे ठरवले होते. त्यासाठी राष्ट्रवादीतील एका माजी केंद्रीय नेत्याच्या माध्यमातून भाजपशी बोलणी सुरु होती.

अमित शाह यांच्या निवासस्थानी शाह, शरद पवार, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस अशी एक बैठक नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला पार पडली होती. मात्र, त्यानंतर शरद पवार यांनी अचानक आपली भूमिका बदलली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या बड्या नेत्यानेच हा निरोप देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात पोहोचवला होता. या टप्प्यावर पवारसाहेब भाजपला पाठिंबा देतील ही शक्यता फार धुसर आहे. पवारांना आपला वारसा जपायचा आहे. त्यांचं बरंच वय झालंय आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीचं हे अखेरचं पर्व आहे, असे या नेत्याने फडणवीस यांना सांगितले होते.

‘रोहित पवारांना बळ, पार्थ पवारांना डावललं, पवार कुटुंबात सारं काही अलबेल नाही?’

राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीची जवळीक वाढू लागली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादीच्या एका नेत्यासोबत चर्चा झाली. त्यावेळी या नेत्याने अजित पवार तुमच्यासोबत सत्ता स्थापन करू शकतात. त्यांचा शिवसेनेसोबत आघाडी करण्यास विरोध आहे, असं फडणवीसांना सांगितलं. त्यासाठी या नेत्याने शिवसेनेसोबत जाण्यास अजितदादा इच्छूक नाहीत, सुप्रिया सुळे यांच्यासोबत अजितदादांचं शीतयुद्ध आहे, तसेच अजितदादांचे चिरंजीव पार्थ पवार यांना डावललं जात असून रोहित पवारांना बळ दिलं जात आहे. त्यामुळेही अजितदादा नाराज असल्याचं या नेत्याने फडणवीस यांना सांगितल्याचा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे.


संबंधित बातम्या:

पहाटेच्या शपथेची इनसाईड स्टोरी, फडणवीस म्हणाले, दादा जोखीम पत्करतोय, दादा म्हणाले माझ्यासोबत 28 आमदार

PHOTO : 80 तासांच्या सरकारची वर्षपूर्ती; ‘त्या’ ऐतिहासिक दिवसाचे फोटो 

शिवसेनेच्या नेतृत्त्वातील युतीला अजित पवारांचा विरोध का?; ‘ट्रेडिंग पॉवर’मधील खळबळजनक दावे

(Why Sharad Pawar change his decision of supporting BJP in 2019)