मराठी बातमी » फोटो गॅलरी » PHOTO : 80 तासांच्या सरकारची वर्षपूर्ती; ‘त्या’ ऐतिहासिक दिवसाचे फोटो
PHOTO : 80 तासांच्या सरकारची वर्षपूर्ती; ‘त्या’ ऐतिहासिक दिवसाचे फोटो
अवघा महाराष्ट्र साखरझोपेत असताना एका वर्षापूर्वी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. (One year complete for oath ceremony of Devendra fadnavis-Ajit Pawar)
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
Published On -
9:13 AM, 23 Nov 2020
अवघा महाराष्ट्र साखरझोपेत असताना एका वर्षापूर्वी म्हणजे 23 नोव्हेंबर 2019 रोजी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजभवनात शपथविधी पार पडला.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपच्या देशभरातील नेत्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला गेला.
विधानसभा निवडणुकीत भाजपला 105 जागा मिळाल्या होत्या. बहुमतासाठी 145 आमदारांची गरज होती.
भाजपला बहुमतासाठी 40 आमदारांची गरज होती. भाजपचे 105, अन्य छोटे पक्ष आणि अपक्ष असे 15 आणि अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे 38 आमदार होते. त्यामुळे बहुमताचा आकडा सहज पार करता येईल, असे फडणवीसांना वाटतं होते.
मात्र त्याचवेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेल्या काही आमदारांचं बंड मोडून काढलं. त्यानंतर शिवसेना आणि काँग्रेससोबत नवी मोट बांधली
त्यामुळे 23 नोव्हेंबरला पहाटे झालेल्या शपथविधीनंतरचं फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद अल्पजीवी ठरलं. फडणवीसांना अवघ्या 80 तासांत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.
तसेच फडणवीस आणि अजित पवारांच्या या राजकीय खेळीचाही फार काळ टिकाव लागला नाही. त्यामुळे त्यांची ही सत्ता अल्पजीवी ठरली.