शरद पवारांचा पुन्हा एकदा फडणवीसांना टोला, तर गडकरीचं कौतुक; हिंसाचाराच्या घटनेवरही भाष्य

| Updated on: Nov 17, 2021 | 5:42 PM

विदर्भातील मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवायला हव्या होत्या, असं पवार म्हणाले. तर गडकरी हे विकासकामं करताना पक्ष पाहत नाहीत, असं म्हणत पवारांनी गडकरींच्या कार्यशैलीचं कौतुक केलंय. पवार चार दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते बोलत होते.

शरद पवारांचा पुन्हा एकदा फडणवीसांना टोला, तर गडकरीचं कौतुक; हिंसाचाराच्या घटनेवरही भाष्य
देवेंद्र फडणवीस, शरद पवार, नितीन गडकरी
Follow us on

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला. तर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचं कौतुक केलं आहे. विदर्भातील मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवायला हव्या होत्या, असं पवार म्हणाले. तर गडकरी हे विकासकामं करताना पक्ष पाहत नाहीत, असं म्हणत पवारांनी गडकरींच्या कार्यशैलीचं कौतुक केलंय. पवार चार दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते बोलत होते. (Sharad Pawar’s criticism of Devendra Fadnavis, while Nitin Gadkari’s praise)

राज्य चालवण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. राज्यातील जनतेनं मला चार वेळा मुख्यमंत्री केलं. राज्य चालवण्याची संधी मिळते तेव्हा मुख्यमंत्र्यांना पूर्ण राज्याकडे पाहावं लागतं. पण मुख्यमंत्री ज्या भागातून आला त्या भागाकडे जास्त कल असतो. विदर्भातल्या मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवायला हव्या होत्या, अशा शब्दात पवार यांनी नाव न घेता फडणवीसांवर टीका केलीय. समस्या काय आहे ती पाहून सोडवावी. ना की त्यांचा पक्ष पाहून. पण असे फार कमी नेते उरले आहेत. नितीन गडकरी यांनी विकासाची अनेक कामे केली. विकासकामं करताना गडकरी पक्ष पाहत नाहीत, अशा शब्दात पवारांनी गडकरींचं कौतुक केलंय.

‘महाराष्ट्रातील वातावरण खराब करणं योग्य नाही’

अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये काही समस्या उद्भवली. त्रिपुरात काही घडलं त्याची प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटणं योग्य नाही. महाराष्ट्रात हिंसेच्या घटना घडवण्यासाठी कायदा हातात घेणं योग्य नाही. महाराष्ट्रातील वातावरण खराब करणं योग्य नाही. त्याचा व्यापारावर मोठा परिणाम होतो. ज्यांची दुकानं फोडली त्यांचा काय दोष? त्रिपुरातील घटनेत व्यापाऱ्यांचा काय दोष? व्यापाऱ्यांचं काम नुकसान होत असेल तर त्याबाबत सरकारनं धोरण आखणं गरजेचं आहे. हिंसक घटनांमध्ये दुकानांचं नुकसान झालं. त्यांच्या मदतीसाठी धोरण आखण्याची गरज असल्याचं पवार म्हणाले.

तुटेपर्यंत ताणू नये, पवारांचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाबाबतही शरद पवार यांनी भाष्य केलं. युनियन लावणाऱ्या लोकांनी तुटेपर्यंत ताणू नये. उद्योग श्रेत्रात काम करणाऱ्या संघटनांनी याचा विचार करावा, असं आवाहन पवार यांनी एसटी कर्मचारी संघटनांना आणि कर्मचाऱ्यांना केलं आहे.

शरद पवार यांचे चार दिवस ‘मिशन विदर्भ’

शरद पवार आजपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. ते चार दिवसात नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांचा दौरा करतील. यादरम्यान ते कार्यकर्त्यांच्या भेटी आणि सभा घेणार आहेत. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा विदर्भ दौरा महत्वाचा मानला जात आहे. विदर्भ हा भाजपचा गड मानला जातो. आता त्याच गडात राष्ट्रवादी आपली पकड मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे.

शरद पवार हे आज दुपारी एक वाजताच्या सुमारास नागपुरात पोहोचतील. त्यानंतर ते व्यापाऱ्यांसोबत बैठक, पत्रकार परिषद आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतील. शरद पवार यांच्या दौऱ्यामुळं विदर्भातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळणार आहे. तसेच, याने पक्षालाही बळ मिळणार असल्याचं बोललं जात आहे.

इतर बातम्या :

पेट्रोल-डिझेलवर सेस वाढवून केंद्र सरकारने राज्याचे 30 हजार कोटी हडपले, नाना पटोलेंचा घणाघात

आमचा बंद शांततेच, रझा अकादमीचे लोक शिरले आणि हिंसाचार घडला, प्रवीण पोटेंचा आरोप

Sharad Pawar’s criticism of Devendra Fadnavis, while Nitin Gadkari’s praise