आमचा बंद शांततेच, रझा अकादमीचे लोक शिरले आणि हिंसाचार घडला, प्रवीण पोटेंचा आरोप

भाजपचे आमदार प्रवीण पोटे यांनी सीटी पोलिसांसमोर स्वत:हून अटक करुन घेतली आहे. दरम्यान, पोटे यांनी आज माध्यमांशी बोलताना गंभीर आरोप केलाय. आम्ही शांततेत बंद पुकारला होता. मात्र, रझा अकादमीचे लोक त्यात शिरले आणि सगळा हिंसाचार घडला, असं पोटे म्हणाले.

आमचा बंद शांततेच, रझा अकादमीचे लोक शिरले आणि हिंसाचार घडला, प्रवीण पोटेंचा आरोप
प्रवीण पोटे, भाजप आमदार
Follow us
| Updated on: Nov 17, 2021 | 3:22 PM

अमरावती : शहर हिंसाचार आणि तोडफोड प्रकरणात अमरावती पोलिसांकडून अटकसत्र सुरु आहे. माजी मंत्री आणि भाजप नेते अनिल बोंडे यांच्यासह अनेक भाजप नेते, पदाधिकाऱ्यांना अटक झाल्यानंतर त्यांनी जामीनावर सुटकाही झालीय. त्यानंतर आज माजी राज्यमंत्री आणि भाजपचे आमदार प्रवीण पोटे यांनी सीटी पोलिसांसमोर स्वत:हून अटक करुन घेतली आहे. दरम्यान, पोटे यांनी आज माध्यमांशी बोलताना गंभीर आरोप केलाय. आम्ही शांततेत बंद पुकारला होता. मात्र, रझा अकादमीचे लोक त्यात शिरले आणि सगळा हिंसाचार घडला, असं पोटे म्हणाले. (Praveen Pote’s allegation against Raza Academy in Amravati violence case)

मी स्वत:हून अटक करुन घेतली. आम्ही शांततेत बंद पुकारला होता. मात्र, त्यात रझा अकादमीचे लोक शिरले आणि सगळा हिंसाचार घडला. हिंदूंवर हल्ला करण्याचा प्रय़त्न केला गेला. त्याला उत्तर देण्यासाठी बंद पुकारला होता, मात्र हिंसाचार घडला. अमरावती शहरात संचारबंदी लावण्यात महाविकास आघाडी सरकारचा हात आहे. हिंदू-मुस्लिम या ठिकाणी काम करतात. संचारबंदीमउळे त्यांचं नुकसान होत आहे. संचारबंदी हटवावी यासाठी जामीन मिळाल्यानंतर पोलिस आयुक्तांशी बोलणार असल्याचंही पोटे यांनी सांगितलं. संचारबंदीमुळे विद्यार्थ्यांचंही मोठं नुकसान होत असल्याचं पोटे म्हणाले.

पोटे यांच्यासह 10 जणांनी अटक करवून घेतली

अमरावतीत उसळलेल्या हिंसाचारात भाजप नेत्यांचा हात आहे, असा आरोप सातत्याने केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनीही मागील तीन दिवसात अनेक भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना अटक केली. भाजपचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनाही अटक केली होती. अमरावतीची शांतता भंग करणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिला होता. तसेच भाजप नेते किरीट सोमय्या यांनाही अमरावतीत न येण्याची विनंती करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

शनिवारपर्यंत संचारबंदी कायम

दरम्यान, अमरावतीतील संचार बंदीचा आज पाचवा दिवस आहे. शहराती इंटरनेट सेवा अजूनही बंद ठेवण्यात आली आहे. त्याचा परिणाम बँकांवरही झाला आहे. शहरातील 100 कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प पडले आहेत. भाजी बाजारही गेल्या चार दिवसांपासून बंद असल्यामुळे भाज्यांच्या किंमतीत तिपटीने वाढ झाली आहे. सामान्य नागरिकांना या संचारबंदीचा चांगलाच फटका बसत आहे. संचारबंदीतून चार तासांची सूट देण्यात आली असली तरीही इंटरनेट बंद असल्याने बँकेत ऑनलाइन व्यवहार बंद पडलेले आहेत.

इतर बातम्या :

भाजपच्या नामनिर्देशित सदस्याला स्थायी समितीतून हटवण्यासाठी 1 कोटीची उधळपट्टी; बीएमसीचा अजब कारभार चव्हाट्यावर

सात दिवसांत 1 हजार रुपयांनी कांद्याच्या दरात घट, सरकारच्या निर्णयामुळेच शेतकऱ्यांचा वांदा

Praveen Pote’s allegation against Raza Academy in Amravati violence case

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.