Shashikant Shinde : माझी शिफारस नसल्यामुळे शिवेंद्रराजे भोसले अध्यक्ष होऊ शकले नाहीत, शशिकांत शिंदेंचा टोला

| Updated on: Dec 07, 2021 | 7:22 AM

शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhonsle) यांना सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं अध्यक्षपद न मिळाल्याच्या कारणावरुन खोचक वक्तव्य केलं आहे.

Shashikant Shinde :  माझी शिफारस नसल्यामुळे शिवेंद्रराजे भोसले अध्यक्ष होऊ शकले नाहीत,  शशिकांत शिंदेंचा टोला
शिवेंद्रराजे भोसले शशिकांत शिंदे
Follow us on

सातारा: राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhonsle) यांना सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं अध्यक्षपद न मिळाल्याच्या कारणावरुन खोचक वक्तव्य केलं आहे. यामध्ये ते म्हणाले “मी निवडून आलो असतो तर शिवेंद्रराजेंची शिफारस पवार साहेबांच्याकडे करु शकलो असतो. या आधी शिवेंद्रराजे भोसले हे अध्यक्ष झाले होते तेव्हा सुद्धा पवार साहेबांच्याकडे मीच शिफारस केली होती, असं शशिकांत शिंदे यांनी सांगितलं. यावेळी माझाच पराभव झाल्यामुळे माझ्यासारख्याची शिफारस कमी पडली त्यामुळेच शिवेंद्रराजे अध्यक्ष होऊ शकले नाहीत, असा टोला आमदार शशिकांत शिंदे यांनी लगावलाय.

आम्ही सर्वांनी शिवेंद्रराजे भोसलेंची शिफारस केलेली

मागच्या वेळा शिवेंद्रराजेंना अध्यक्ष करताना मी आणि रामराजे नाईक निंबाळकर वगैरे आम्ही सगळे होतो. पवार साहेबांकडे शिवेंद्रराजे भोसले यांची शिफारस आता जर मी असतो तर मी शिफारस करु शकतो. माझा पराभव झाल्यानं मुळं त्यांच्या शिफारसीला माझ्या सारख्याची शिफारस कमी पडली असेल, असं शशिकांत शिंदेंनी म्हटलं.

पराभवामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

माझ्या पराभवामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर होता. त्याची दखल राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्टींना घ्यावी लागली. परंतु ते करत असताना शिवेंद्रराजे भोसले यांनी केलेल्या कामाचं कौतुक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केलं आहे. आजपर्यंत या बँकेत शिवेंद्रराजे भोसलेंना जितका वेळ अध्यक्षपद दिलं तितका वेळ कुणाला मिळाला नसेल. त्यामुळं नितीन पाटील यांना संधी देण्यात आली आहे, असं शशिकांत शिंदे म्हणाले.

सहकार पॅनेल पक्षविरहित होतं

शिवेंद्रराजे भोसले यांना अध्यक्षपद देऊ नका, असं सांगायला गेलो नाही. मी पराभूत झालो असलो तरी माझा बँकेत माझा हस्तक्षेप नव्हता. शिवेंद्रराजे भोसले भाजपमध्ये गेले तरी त्यांचं अध्यक्षपद काढून घेण्यात आलं नव्हतं. जिल्हा बँकेत पक्षविरहित कामकाज असतं. सहकार पॅनेलची निर्मिती देखील पक्ष विरहित झाली होती. असं शशिकांत शिंदे म्हणाले.

स्वीकृत सदस्य होणार का?

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे स्वीकृत संचालक होणार का? असं विचारलं असता शशिकांत शिंदे यांनी पक्षनेतृत्त्वाकडे तशी कोणतीही मागणी केली नसल्याचं सांगितलं आहे. दरम्यान, सातारा जिल्हा बँकेचं अध्यक्षपद नितीन पाटील तर उपाध्यक्षपद अनिल देसाई यांच्याकडं देण्यात आलं आहे.

इतर बातम्या:

Nitin Patil | शिवेंद्रराजेंना धक्का, नितीन पाटलांच्या पारड्यात शरद पवारांचं मत, सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदी वर्णी

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निकाल : शशिकांत शिंदे-शंभूराज देसाईंना पराभवाचा धक्का, सहकारमंत्र्यांची बाजी

 

Shashikant Shinde comment on why Shivendraraje Bhonsle not get Chairman post of Satara District Central Cooperative Bank