Nitin Patil | शिवेंद्रराजेंना धक्का, नितीन पाटलांच्या पारड्यात शरद पवारांचं मत, सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदी वर्णी

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीनंतर सोमवारी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी निवडी झाल्या. भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे नितीन पाटील यांची नावं अध्यक्षपदासाठी चर्चेत होती.

Nitin Patil | शिवेंद्रराजेंना धक्का, नितीन पाटलांच्या पारड्यात शरद पवारांचं मत, सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदी वर्णी
शिवेंद्रराजे भोसले, शरद पवार, नितीन पाटील
Follow us
| Updated on: Dec 06, 2021 | 12:40 PM

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Satara District Bank Election) अध्यक्षपदी नितीन पाटील (Nitin Patil) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रवादीच्या नितीन पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांचा पत्ता कट झाला आहे. तर उपाध्यक्षपदी अनिल देसाई (Anil Desai) यांची वर्णी लागली आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीनंतर सोमवारी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी निवडी झाल्या. भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादीतर्फे वाईतील नितीन पाटील यांची नावं अध्यक्षपदासाठी चर्चेत होती. शिवेंद्रराजे भोसलेंकडे तीन वर्षांपासून अध्यक्षपदाची धुरा होती.

शिवेंद्रराजेंची पवारांकडे गळ

चार दिवसांपूर्वी शिवेंद्रराजे यांनी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीगाठी घेत अध्यक्षपदासाठी इच्छा व्यक्त केली होती. सिल्वर ओक या पवारांच्या निवासस्थानी भेट घेत शिवेंद्रराजे भोसले यांनी “बँकेत राजकारण नाही, तर सगळ्यांना सोबत घेऊन कारभार केला” असं शरद पवार यांना संगितलं होतं. यावेळीही अध्यक्षपद मिळावं, अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवल्याचं बोललं जात होतं.

पवारांकडून कौतुक

शरद पवारांनी देखील शिवेंद्रराजे भोसले यांनी ज्या पद्धतीनं बँकेचे चेअरमन म्हणून काम केलं त्याबद्दल कौतुक केलं होतं. जिल्हा बँकेत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना मानणाऱ्या संचालकांची संख्या देखील लक्षणीय आहे. त्यानुसार त्यांची अध्यक्षपदासाठी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र राष्ट्रवादीकडून बिनविरोध निवडून आलेल्या नितीन पाटील यांच्या पारड्यात पवारांनी मत टाकले.

दरम्यान, अध्यक्षपदाच्या निवडीवेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, खा. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रराजे भोसले  जिल्हा बँकेत उपस्थित होते.

सातारा जिल्हा बँकेचे निकाल काय

जावळी सोसायटी गटातून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने निसटता पराभव झाला, तर ज्ञानदेव रांजणे यांनी बाजी मारली. पाटण विकास सेवा सोसायटी गटात सत्यजीत विक्रमसिंह पाटणकर विजयी झाले असून त्यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी राहिलेले  शिवसेना उमेदवार आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना पराभवाचा धक्का बसला आहे. तर कराड सोसायटी गटातून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विजयी झाले असून विलासकाका उंडाळकर यांचे काँग्रेसवासी पुत्र उदयसिंह उंडाळकर यांचा पराभव झाला.

संबंधित बातम्या:

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निकाल : शशिकांत शिंदे-शंभूराज देसाईंना पराभवाचा धक्का, सहकारमंत्र्यांची बाजी

सर्वांना सोबत घेत कारभार केला, जिल्हा बँकेचं अध्यक्षपद मिळावं, भाजप आमदाराची शरद पवारांसमोर इच्छा, सूत्रांची माहिती

ठाण्यातील शहापूरमध्ये दोन दिवसात शिवसेनेला दुसरा धक्का, नगरसेवकांसह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.