सर्वांना सोबत घेत कारभार केला, जिल्हा बँकेचं अध्यक्षपद मिळावं, भाजप आमदाराची शरद पवारांसमोर इच्छा, सूत्रांची माहिती

सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhonsle) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.

सर्वांना सोबत घेत कारभार केला, जिल्हा बँकेचं अध्यक्षपद मिळावं, भाजप आमदाराची शरद पवारांसमोर इच्छा, सूत्रांची माहिती
शरद पवार शिवेंद्रराजे भोसले
Follow us
| Updated on: Dec 04, 2021 | 7:11 AM

सातारा: राज्यात नुकत्याच पहिल्या टप्प्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुकांचा (District Bank Election) टप्पा पार पडलाय. सध्या अध्यक्ष निवडींचा कार्यक्रम सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या जिल्हा बँकेतील पराभवामुळं सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीची (Satara District Bank) राज्यात सर्वाधिक चर्चा झाली होती. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhonsle) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. जिल्हा बँकेत सगळ्यांना सर्वांना सोबत घेऊन कारभार केला असल्यानं अध्यक्षपद मिळावं,अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवल्याची माहिती आहे. तर, शरद पवारांनी देखील शिवेंद्रराजे भोसले यांनी ज्या पद्धतीनं बँकेचे चेअरमन म्हणून काम केलं त्याबद्दल कौतुक केलं असल्याची माहिती आहे.

सिल्वर ओकवर भेट झाल्याची माहिती

साता-याचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक या त्याच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्या भेटीत जिल्हा बँक अध्यक्ष पदाबाबत चर्चा केल्याची सुत्रांची माहिती आहे.

शरद पवार यांच्याकडून शिवेंद्रराजे भोसले यांचं कौतुक

शरद पवार यांनी त्या भेटीमध्ये शिवेंद्रराजे यांचं कौतुक केल्याची माहिती आहे. शिवेंद्रराजे आपण बँक उत्तम चालविली आहे अगदी भाऊसाहेब महाराजांच्या पावलावर पाऊल टाकत आपण काम करताय या शब्दांत शिवेंद्रराजे भोसले यांची शरद पवार यांनी स्तुती केली असल्याची माहिती आहे.

सर्वांना सोबत घेत बँकेचा कारभार केला

शिवेंद्रराजे भोसले यांनी बँकेत राजकारण नाही तर सगळ्यांना सोबत घेऊन कारभार केल्याचं शरद पवार यांना संगितलं. यावेळी ही अध्यक्षपद मिळावं अशी इच्छा त्यांनी बोलुन दाखवली असल्याची माहिती आहे.

शिवेंद्रराजे भोसले यांचं पारड जड

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदासाठी शिवेंद्रराजे भोसले यांचं नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. जिल्हा बँकेत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना मानणाऱ्या संचालकांची संख्या देखील लक्षणीय आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस सहकारात पक्षीय राजकारण नको या मुद्यावर शिवेंद्रराजे भोसले यांना पुन्हा एकदा चेअरमन पदाची संधी देऊ शकते. वाईचे नितीन पाटील यांचं नाव देखील अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे.

इतर बातम्या:

ठाण्यातील शहापूरमध्ये दोन दिवसात शिवसेनेला दुसरा धक्का, नगरसेवकांसह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Maharashtra News LIVE Update | पवईत जमिनीच्या वादावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Shivendraraje Bhonsle meet NCP Chief Sharad Pawar and said he is ready for accept post Chairman at Satara District Central Co Operative Bank again

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.