Maharashtra Minister Portfolios : विखेंकडे महसूल, मुनगंटीवारांकडे वन, तर चंद्रकांतदादांकडे उच्च व तंत्र शिक्षण, शिंदे सरकारचं खाते वाटप जाहीर

Maharashtra Minister Portfolios : राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच खाते वाटप करू असं म्हटलं होतं. मात्र, खाते वाटप जाहीर होत नव्हतं. त्यावरून शिंदे सरकारवर टीका करण्यात येत होती.

Maharashtra Minister Portfolios : विखेंकडे महसूल, मुनगंटीवारांकडे वन, तर चंद्रकांतदादांकडे उच्च व तंत्र शिक्षण, शिंदे सरकारचं खाते वाटप जाहीर
विखेंकडे महसूल, मुनगंटीवारांकडे वन, तर चंद्रकांतदादांकडे उच्च व तंत्र शिक्षण, शिंदे सरकारचं खाते वाटप जाहीर
Image Credit source: tv9 marathi
भीमराव गवळी

|

Aug 14, 2022 | 5:06 PM

मुंबई: अखेर शिंदे-फडणवीस सरकारने राज्य मंत्रिमंडळातील खाते वाटप (Maharashtra Minister Portfolios) जाहीर केलं आहे. या खाते वाटपानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग राहणार आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वन खातं देण्यात आलं आहे. या शिवाय चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण हे खातं देण्यात आलं आहे.

राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच खाते वाटप करू असं म्हटलं होतं. मात्र, खाते वाटप जाहीर होत नव्हतं. त्यावरून शिंदे सरकारवर टीका करण्यात येत होती. त्यानंतर खाते वाटपाची एक यादी सोशल मीडियावर फिरत होती. मात्र, फडणवीस यांनी तुम्ही जी यादी फिरवली त्यापेक्षा वेगळी खाती देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार शिंदे-फडणवीस सरकारने धक्का देत खाते वाटप जाहीर केलं आहे. अनेक मंत्र्यांना अनपेक्षित खाती देण्यात आली आहेत.

कुणाला कोणतं खातं

राधाकृष्ण विखे-पाटील: महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

सुधीर मुनगंटीवार: वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

चंद्रकांत पाटील: उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

डॉ. विजयकुमार गावित: आदिवासी विकास

गिरीष महाजन: ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

गुलाबराव पाटील: पाणीपुरवठा व स्वच्छता

दादा भुसे: बंदरे व खनिकर्म

संजय राठोड: अन्न व औषध प्रशासन

सुरेश खाडे: कामगार

संदीपान भुमरे: रोजगार हमी योजना व फलोत्पादन

उदय सामंत: उद्योग

प्रा.तानाजी सावंत: सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

रवींद्र चव्हाण: सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

अब्दुल सत्तार: कृषी

दीपक केसरकर: शालेय शिक्षण व मराठी भाषा

अतुल सावे: सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

शंभूराज देसाई: राज्य उत्पादन शुल्क

हे सुद्धा वाचा

मंगलप्रभात लोढा: पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें