AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेण्यास विलंब करायचे; शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचा पुन्हा निशाणा

शिंदे गटाच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका सुरूच आहे. आता आणखी एका नेत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केला आहे.

उद्धव ठाकरे सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेण्यास विलंब करायचे; शिंदे गटाच्या 'या' नेत्याचा पुन्हा निशाणा
| Updated on: Oct 22, 2022 | 1:07 PM
Share

मुंबई : शिंदे गटाच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका सुरूच आहे. आतापर्यंत अनेक गंभीर आरोप शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केले आहेत. आता पुन्हा एकदा असाच एक आरोप शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील (Chimanrao Patil) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या (farmers) हिताचे निर्णय घेण्यास विलंब करायचे असं चिमणराव पाटील यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे सरकारमध्ये एकप्रकारचा सुस्तपणा होता अशी टीका चिमणराव पाटील यांनी केली आहे.

नेमकं चिमणराव पाटील यांनी काय म्हटलं?

शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे. उद्धव ठाकरे हे शेतकरी हिताचे निर्णय घेण्यातही विलंब करायचे असे चिमणराव पाटील यांनी म्हटलं आहे. ठाकरे सरकारमध्ये सुस्तपणा होता. आम्ही त्यांना म्हणायचो शेतकरी हिताचे पारदर्शी निर्णय लवकरात लवकर घ्या पण ते निर्णय घेताणा मागे, पुढे पहायचे असं पाटील यांनी म्हटलं आहे.

मात्र त्यांनी यावेळी नव्या सरकारचं कौतुक केलं आहे. शिंदे सरकार आल्यापासून प्रशासनात गतिमानता आली. एकनाथ शिंदे यांनी निर्णयाला गती दिल्याचं चिमणराव पाटील यांनी म्हटलं आहे.

अब्दुल सत्तार यांची टीका

दुसरीकडे शिंदे गटाचे आणखी एक आमदार आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. आता उद्धव ठाकरे यांचा धाक उरला नसल्याची टीका त्यांनी केली होती. उद्धव ठाकरे यांचा धाक असता तर चाळीस आमदार पक्ष सोडून गेलेच नसते. उद्धव ठाकरे यांचा धाक असता तर लाखो कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला नसता अशी टीका  अब्दुल सत्तार यांनी केली आहे.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान