Eknath Shinde : शिंदे गटाचे आमदार थांबलेल्या हॉटेलमधून तिघांना अटक, गोव्यात नेमकं काय घडलं?

या तिघांचे आयडी कार्ड फेक असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने अटकेची कारवाई केली. मात्र त्यानंतर वेगळीच माहिती समोर आली आहे.

Eknath Shinde : शिंदे गटाचे आमदार थांबलेल्या हॉटेलमधून तिघांना अटक, गोव्यात नेमकं काय घडलं?
हॉटेलमधून पोलिसांनी तिघांना अटक केली
दादासाहेब कारंडे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jul 02, 2022 | 8:30 PM

गोव्यात शिंदे गटाचे आमदार गेल्या काही दिवसांपासून मुक्कामी होते. आजच हे आमदार गोव्यातून (Goa) मुंबईत दाखल झाले. मात्र गोव्यात घडलं निराळेच, कारण शिंदे गटाचे आमदार ज्या ताज हॉटेलमध्ये गोव्यात थांबले होते, त्या हॉटेलमधून (Hotel) पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या तिघांचे आयडी कार्ड फेक (Fake ID) असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने अटकेची कारवाई केली. मात्र त्यानंतर वेगळीच माहिती समोर आली आहे. गेली तीन दिवस शिंदे गटाचे आमदार गोव्यात होते. उद्या विधानसभेत विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक होत आहे. त्यासाठी हे आमदार आज सायंकाळी मुंबईत दाखल झाले. ते इथं आल्यानंतर ज्या हॉटेलमध्ये ते राहत होते त्या हॉटेलमध्ये तिघांना अटक करण्यात आली.

फेक आयडीमुळं तिघांना अटक

शिंदे गटाचे आमदार ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलमधून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. हरियाणा आणि उत्तराखंडमधील 3 जणांना अटक करण्यात आली आहे. फेक आयडीमुळं तिघांना अटक करण्यात आली आहे. या तीन जणांच्या हालचाली या संशयास्पद होत्या. हे तिघे हेरगिरी करतात, अशा प्रकारचा संशय पोलिसांना आला. त्यामुळं या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर चौकशीदरम्यान वेगळीच माहिती समोर आली. या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

हरियाणा आणि उत्तराखंडमधील आरोपी

हे तिघेही संशयास्पद हालचाली करताना दिसून आले. पोलिसांच्या लक्षात ही बाब येताच हरियाणा आणि उत्तरखंडमधील तिघांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे शिंदे गटाचे आमदार ज्या हॉटेलमध्ये हे होते. त्याच हॉटेलमधून या तिघांना अटक करण्यात आली. फेक आयडीद्वारे वास्तव्य केल्यानं त्यांना अटक केल्याचं पोलिसांनी सांगितलं. गेली तीन दिवस शिंदे गटाचे आमदार गोव्यात होते. उद्या विधानसभेत विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी आमदार आज सायंकाळी मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत आल्यानंतर ज्या हॉटेलमध्ये गोव्यात ते राहत होते त्या हॉटेलमध्ये तिघांना अटक करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें