‘त्यांची ती सहल, आमचा तो मेळावा’ गद्दार म्हणत आणखी एका शिवसेना नेत्यानं शिंदे गटाला डिवचलं!

संध्याकाळी होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या आधी राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु, शिंदे गटावर आणखी एका शिवसेना नेत्याची टीका

'त्यांची ती सहल, आमचा तो मेळावा' गद्दार म्हणत आणखी एका शिवसेना नेत्यानं शिंदे गटाला डिवचलं!
नेमकं कुणी केलं हे विधान?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 05, 2022 | 8:38 AM

भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर : शिवतीर्थावरील मेळावा (Shivaji Park Dussehra Melava) हा विरोधकांना धडकी भरवणारा होईल, असा विश्वास कोल्हापूरमधील (Kolhapur) शिवसेनेचे नेते संजय पवार (Sanjay Pawar) यांनी व्यक्त केला. दसरा मेळाव्याला जायला निघण्याआधी त्यांनी हे वक्तव्य केलं. टीव्ही 9 मराठीसोबत बोलताना संजय पवार यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली. त्यांची ती सहल आहे, असं म्हणत खोचक टोला संजय पवार यांनी यावेळी लगावला.

शिवसेना नेते संजय पवार यांनी म्हटलंय की, टुर्स आणि ट्रॅव्हल कंपन्या महाराष्ट्राने देशभरात अनेकदा पाहिलेल्या आहेत. त्यात मोफत गाडी, नाश्ता, जेवणं देणं, हे असतं. पण ती सहल होते. आमची सहल नाही. आमचा मेळावा आहे, असं म्हणत संजय पवार यांनी शिंदे गटावर टीका केली.

हे सुद्धा वाचा

यंदाचा दसरा मेळावा भव्यदिव्य असा होणार, असा विश्वास संजय पवार यांनी व्यक्त केला. आमची गर्दी कमी व्हावी म्हणून शिंदे गटाने दसरा मेळावा घेतलाय. आम्हाला चिडवण्यासाठी बीकेसीत दसरा मेळावा घेण्याचा घाट शिंदे गटाने घातलाय. पण आम्ही शिवतीर्थावर विचारांचं सोन लुटायला जाणार आहोत. गद्दार कसले विचार मांडणार? असा सवालही संजय पवार यांनी उपस्थित केला.

पक्षप्रमुखांचा विश्वासघात कसा करायचा? गद्दारी कशी करायची?, हा विचार सांगणार हे लोकं आहेत, असं म्हणत पवार यांनी शिंदे गटावर टीका केली. सत्तेसाठी आणि पैशांसाठी बंडखोरी करणाऱ्यांकडून कसल्या विचारांची अपेक्षा करणार, असा टोलाही त्यांनी लगावला.

काल मी आपल्या माध्यमातून पाहिलं तर अनेकांना माहिती नाही की कुणाची सभाय? पण बसा, तुम्हाला मुंबई फिरवून आणतो, असं म्हणून लोकांना आणलं जात असल्याचा टोलाही संजय पवार यांनी लगावला.

Non Stop LIVE Update
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....