मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच, शिवसेनेच्या बालेकिल्यात भाजपचे पोस्टर्स!

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहरात भाजपने (Shiv Sena BJP poster war) पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशी बॅनर्स झळकवली आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच, शिवसेनेच्या बालेकिल्यात भाजपचे पोस्टर्स!
Follow us
| Updated on: Nov 01, 2019 | 11:55 AM

रत्नागिरी : शिवसेना आणि भाजपमध्ये सत्ता स्थापनेसाठी संघर्ष सुरु आहे. दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोड्या करत आहेत. त्यातच आता शिवसेनेच्या बालेकिल्यात भाजपने पोटर्स वॉर (Shiv Sena BJP poster war) सुरु केलं आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहरात भाजपने (Shiv Sena BJP poster war) पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अशी बॅनर्स झळकवली आहेत.

राजापूर रिफानयरीचा मुद्दा गरम असताना या बॅनर्सने शिवसेनेला एकप्रकारे डिवचलं आहे. राजापूर शहरातील मुख्य रस्त्यांवर हे बॅनर्स भाजपने झळकावून, सेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला  आहे.

मातोश्रीबाहेरील होर्डिंग हटवले

बृहन्मुंबई महानगरपालिकेने ‘मातोश्री’ बाहेरील होर्डिंग्ज हटवले. या होर्डिंग्जवर ‘महाराष्ट्रातील मुख्यमंत्री फक्त आदित्य ठाकरे’ असे लिहिले  होते.  मात्र ठाकरे निवासस्थानाबाहेरील होर्डिंग्ज महापालिकेने हटवले.

मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असा सूर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कायम ठेवला आहे. ज्यांच्याकडे बहुमत नाही, त्यांनी धाडस करु नये, शिवसेना बहुमत सिद्ध करु शकते, असा इशाराही राऊत यांनी दिला. संजय राऊत यांनी पुन्हा पत्रकार परिषद (Sanjay Raut on Shivsena CM) घेत भाजपला आव्हान दिलं.

आम्ही हवेत बोलत नाहीत, आकडे नसताना आमचं सरकार येणार हे आम्ही कधीही म्हटलं नाही. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, हे लिहून घ्या. शिवसेनेने मनावर घेतलं, तर स्थिर सरकारसाठी शिवसेना बहुमत सिद्ध करु शकते, असं संजय राऊतांनी दंड फुगवून सांगितलं.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.