शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या जीवाला धोका

सुषमा अंधारे यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या जीवाला धोका
Image Credit source: social media
| Updated on: Oct 13, 2022 | 10:53 PM

मुंबई : ठाण्यातील कार्यक्रमात शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल होती. या प्रकरणी त्यांच्याविरोधात प्रक्षोभक भाषण केल्या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर सुषमा अंधारे यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: सुषमा अंधारे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

माझ्या जीवाला धोका आहे, बाहेर पडू नका असे इनपुट मला आले असल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या. माझ्यावरती केस किंवा हल्ला होऊ शकतो अशी माहिती मला देण्यात आल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगीतले.

अंधारे यांना पोलिस संरक्षणाची देखील विचारणा करण्यात आली आहे. मात्र, मी या इनपूटकडे लक्ष न देता माझे काम करत राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

सुषमा अंधारे या सध्या ठाकरे गटाची फायर गन बनल्या आहेत. आपल्या आक्रमक भाषण शैलीने त्या थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह सर्व नेत्यांचा खरपूस समाचार घेत आहेत.