Rajyasabha Election : छत्रपती संभाजीराजेंना राज्यसभेसाठी शिवसेना पुरस्कृत उमेदवारी, सूत्रांची माहिती, मविआच्या दबावानंतर निर्णय

छत्रपती संभाजीराजे यांना शिवसेना पुरस्कृत राज्यसभेची उमेदवारी देण्यात येणार आहे. टीव्ही ९ ला सूत्रांनी ही माहिती दिली आहे. संभाजीराजेंना सहावी जागा देण्यासाठी महाविकास आघाडीतून शिवसेनेवर दबाव होता. त्यातून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. त्यापूर्वी छत्रपती संभाजीराजे शिवसेनेत आले तरच त्यांना उमेदवारी देण्यात येईल, अशी भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मांडली होती.

Rajyasabha Election : छत्रपती संभाजीराजेंना राज्यसभेसाठी शिवसेना पुरस्कृत उमेदवारी, सूत्रांची माहिती, मविआच्या दबावानंतर निर्णय
छत्रपती संभाजीराजेंना राज्यसभेसाठी शिवसेना पुरस्कृत उमेदवारी, सूत्रांची माहिती, मविआच्या दबावानंतर निर्णय
Follow us
| Updated on: May 22, 2022 | 2:50 PM

मुंबईछत्रपती संभाजीराजे (Chatrapati Sambhajiraje) यांना शिवसेना पुरस्कृत राज्यसभेची उमेदवारी देण्यात येणार आहे. टीव्ही ९ ला सूत्रांनी ही माहिती दिली आहे. संभाजीराजेंना सहावी जागा देण्यासाठी महाविकास आघाडीतून शिवसेनेवर (Shivsena) दबाव होता. त्यातून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. त्यापूर्वी छत्रपती संभाजीराजे शिवसेनेत आले तरच त्यांना उमेदवारी देण्यात येईल, अशी भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मांडली होती. तर या प्रकरणात संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (Cm Uddhav Thackeray) भेटही घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुरुवातीला संभाजीराजेंना पाठिंबा देणार असल्याचे सांगितले होते, मात्र नंतर शनिवारी जी शिवसेनेची भूमिका असेल तीच राष्ट्रवादीची राहील असे सांगितले होते. त्यानंतर महाविकास आघाडीतून शिवसेनेवर संभाजीराजेंसाठी दबाव टाकण्यात आल्याची माहिती आहे. त्यातून छत्रपतींचा राज्यसभेचा मार्ग सकर झाल्याचे दिसते आहे.

कसं असेल राज्यसभेची निवडणूक?

दरम्यान शिवसेना खासदास संजय राऊत यांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे या जागेचं गणित अजूनही ठरताना दिसत नाही. राज्यसभेच्या सहाही जागांचं गणित पाहिलं तर शिवसेनेचे तसे 56 आमदार होते, पण रमेश लटकेंचं निधन झाल्यानं शिवसेनेचा आकडा 55 इतका आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे 54 आमदार, काँग्रेसचे 44 आमदार. इतर पक्ष 8 आणि अपक्ष 8 आमदार असं एकूण महाविकास आघाडीकडे 169 आमदारांचं संख्याबळ तर भाजपकडे अपक्षांसह 113 आमदार आहेत. म्हणजेच महाविकास आघाडी आणि भाजपच्या आमदारांची संख्या पाहता, राज्यसभेची शिवसेनेला एक जागा राष्ट्रवादीला एक जागा काँग्रेसला एक जागा आणि भाजपचे 2 सदस्य निवडून जाऊ शकतात. त्याची मतं महाविकास आघाडी आणि भाजपकडे आहेत तर 5 जण आरामात निवडून जाऊ शकतात आणि त्यानंतर उर्वरित मतांचा विचार केला तर शिवसेनेकडे 13 मतं, राष्ट्रवादी 12 मतं, काँग्रेस 2 मतं ,इतर आणि अपत्र 16 मतं. अशी एकूण 43 मतं होतात. या गणितानं संभाजीराजे सहज निवडूण येऊ शकतात.

शिवसेनेची राजेंना अट काय?

शिवसेनेनं मदत करावी म्हणून संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली मात्र शिवसेनेत प्रवेश केला तर उमेदवारी देऊ असं उद्धव ठाकरेंनी संभाजीराजेंना सांगितल्याची माहिती आहे. तर संभाजी राजेंनी अपक्षच लढावं या साठी भाजप तटस्थ आहे. शिवसेनेकडून संजय राऊतांना उमेदवारी जाहीर झाली मात्र 6 व्या जागेवरुन महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेनं दावा केला हीच जागा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून द्यावी, असं संभाजीराजेंची मागणी आहे..मात्र पक्षप्रवेश केला तरच उमेदवारी देऊ, अशी शिवसेनेची भूमिका आहे. त्यामुळे अजूनही या जागेचं गणित ठरताना दिसत नाही.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.