AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijay Wadettiwar : काय भिकारXXपणा सुरू आहे… शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर बोलताना विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली

महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे, जिथे दररोज सरासरी तीन शेतकरी जीव देत आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत या गंभीर मुद्द्यावर सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. राज्यपालांचे भाषण आणि सरकारच्या निष्क्रियतेवर त्यांनी संताप व्यक्त केला, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. मराठवाडा व पश्चिम विदर्भात आत्महत्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

Vijay Wadettiwar : काय भिकारXXपणा सुरू आहे... शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर बोलताना विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली
विजय वडेट्टीवार
| Updated on: Feb 25, 2026 | 2:36 PM
Share

राज्यात रोज तीन शेतकरी आत्महत्या करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे अख्खं राज्य हादरून गेलं आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. आज विधानसभेतही शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावर चर्चा झाली. यावेळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अत्यंत आक्रमकपणे आपली भूमिका मांडली. मात्र, ही भूमिका मांडत असताना त्यांची जीभ घसरली. तोंडातून नको तो शब्द बाहेर आला. त्यामुळे सर्वच आवाक् झाले.

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यावेळी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत असताना विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली. काय भीकारचोटपणा सुरू केला आहे. एकीकडे लोक आत्महत्या करतात तर दुसरीकडे 5 ट्रिलियन संदर्भात बोललं जात आहे. 14 जिल्ह्यात आत्महत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. राज्यात 21 हजार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यातील फक्त 10 हजार शेतकऱ्यांना शासनाने मदत केली आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

राज्यपालांच्या भाषणावर खेद व्यक्त करतो

महापुरुषांच्या आदेशाचं या राज्यात कुठे पालन केलं जातंय? छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला जातो आणि अवघ्या 7 महिन्यात पुतळा कोसळतो. पदोपदी शिवाजी महाराजांचा अपमान केला जातोय. या राज्यात सर्वांना घेऊन जायची भूमिका असली पाहिजे. पण दोन समाजात भांडणं लावून राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडवली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं काय झालं? मागील राज्यपालांच भाषण आणि आताच भाषण हे एकच असल्याचं पाहायला मिळतंय. आम्ही राज्यपालांच्या अभिभाषणावर खेद व्यक्त करतोय, असं वडेट्टीवार म्हणाले.

आकडा आला समोर

दरम्यान, राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. राज्यात दररोज सरासरी 3 शेतकरी आत्महत्या करत असल्याची माहिती विधानसभेच्या प्रश्नोत्तरांमध्ये आली आहे. 2009 ते 2025 या कालावधीत एकूण 2783 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली आहे. 2025 या वर्षातच सर्वाधिक 200 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. सर्वाधिक आत्महत्या पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात झाल्याचं दिसून आलं आहे. या दोन विभागात आत्महत्येची तब्बल 1987 प्रकरणे समोर आली आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...